१०० डब्यांची ही ट्रेन चालवतात ७ चालक! जगातील सर्वात लांब प्रवासी रेल्वेविषयी जाणून घ्या

278

भारतातच नाहीतर संपूर्ण जगात अतिशय सुंदर असे रेल्वेमार्ग आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात सुंदर पॅसेंजर ट्रेन सध्या धावत आहे. ही जगातील सर्वात मोठी पॅसेंजर ट्रेन असून यातील डब्यांची संख्या १०० आहे ही ट्रेन एकाचवेळी सात चालक चालवतात. आल्प्स पर्वतरागांमध्ये धावणाऱ्या या सुंदर ट्रेनविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : वंदे भारत रेल्वेचा देसी मेन्यू! शेगावची कचोरी, सावजी चिकनसह बरेच काही…वाचा संपूर्ण यादी)

जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन 

आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्वित्झरलॅंडने जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन त्यांच्याकडे धावत असल्याचा दावा केला आहे. स्विस रेल्वेशी संलग्न असलेल्या राएटियन रेल्वे कंपनीने १०० डबे असलेली ही सुमारे १.९ किमी लांबीची ट्रेन चालवली. युरो न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या विक्रमाची गिनीज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा जगातील या सुंदर रेल्वे मार्गावर प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

New Project 11 2

४ हजार ५५० आसनांची ट्रेन 

स्वित्झर्लंडमध्ये धावणाऱ्या ट्रेनला १०० डबे असून यामध्ये एकूण आसनांची संख्या ४ हजार ५५० एवढी आहे. ही ट्रेन एकाचवेळी ७ चालक चालवतात. यापूर्वी बेल्जियममध्ये १.७ किमी लांबीची ट्रेन धावली होती. The Rhartian रेल्वे कंपनीने बनवलेली ही ट्रेन तब्बल २२ बोगदे आणि ४८ पुलांवरून प्रवास करते. ही ट्रेन जागतिक वारसा स्थळ असलेल्या अल्बुला/बर्निना मार्गावर सुद्धा धावली २००८ मध्ये या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते या सुंदर मार्गाची जगभरात चर्चा आहे. कोविड महामारीमुळे रेल्वेवर सुद्धा परिणाम झाला होता त्यामुळे या नव्या ट्रेनच्या माध्यमांतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, स्वित्झर्लंडच्या सुंदर दऱ्या, मार्ग जगाला दाखवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्विस रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

New Project 12 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.