Worli Fort : का आहे वरळीचा किल्ला इतका प्रसिद्ध?

10
Worli Fort : का आहे वरळीचा किल्ला इतका प्रसिद्ध? 
Worli Fort : का आहे वरळीचा किल्ला इतका प्रसिद्ध? 
वरळी हे दक्षिण मुंबईतलं एक अप्रतिम क्षेत्र आहे. हे क्षेत्र सुंदर सी-व्ह्यूसोबतच भव्य इमारतींसाठी ओळखलं जातं. या भागात अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी लिंकचं अतिशय सुंदर दृश्य पाहता येतं. (Worli Fort)
याशिवाय वरळी हे रोजगाराचे मोठे केंद्र आहे. इथे दिवसा ऑफिसला जाणाऱ्या लोकांची गजबज पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी वाहनांची रहदारी कमी होते, त्यावेळेस हा एक अतिशय शांत परिसर होतो. इथे तुम्ही समुद्रावरून येणाऱ्या मंद वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. रात्री किंवा पहाटे शतपावली करण्यासाठी हे अतिशय योग्य ठिकाण आहे. (Worli Fort)
वारली आणि त्याच्या आसपासचा परिसर अतिशय समृद्ध आहे. संपूर्ण मुंबईतल्या काही उच्चभ्रू परिसरात, जसे की, लोअर परळ आणि महालक्ष्मी या ठिकाणांसोबतच फक्त काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात नेहमीच काहीतरी चांगलं मनोरंजक घडत असतं. जसं की, फेस्टिव्हल्स, एक्झार्बीशन्स इत्यादी. त्यामुळे तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही नाही. (Worli Fort)
◆वरळी येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं
● वांद्रे-वरळी सी लिंक
वांद्रे किंवा वरळीची कोणतीही ट्रिप नेत्रदीपक सी-लिंक वरून ड्राइव्हचा अनुभव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.  ५.६ किलोमीटर लांब असलेल्या या सी-लिंकवरून ड्राइव्ह कारायला फक्त काही मिनिटं लागतात. पण या आठ पदरी रस्त्याच्या सी-लिंकवरून ड्राइव्ह करताना या अप्रतिम आर्किटेक्चरचा प्रभाव कायम आपल्यासोबत राहतो. (Worli Fort)
● धोबी घाट
धोबी घाट हे एक असं ठिकाण आहे, जिथे कपडे धुण्यासाठी शेकडो वॉशिंग स्टेशन्स आहेत. दररोज हजारो धोबी इथे कपडे धुतात. या ठिकाणी सर्वत्र स्वच्छ कपडे वाळत घातलेले तुम्हाला दिसतील. (Worli Fort)
● वरळी सी-फेस
वरळी सी-फेस हे वरळी इथलं समुद्र किनारपट्टीजवळचं फेरफटका मारण्यासाठी असलेलं ठिकाण आहे. इथे चालताना किंवा जॉगिंग करताना अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. या ठिकाणी वरळी आणि मुंबईच्या आसपासचे रहिवासी दररोज विशेषत: सकाळी लवकर आणि संध्याकाळी व्यायाम, वॉक आणि जॉगिंग करण्यासाठी येतात. (Worli Fort)
● नेहरू तारांगण
नेहरू सेंटर इथलं नेहरू तारांगण हे १९७७ साली बांधलं गेलं होतं. आजही ही इमारत अतिशय सुस्थितीत आहे. सर्व वयोगटातल्या विज्ञानप्रेमींना भेट देण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणी शिक्षण आणि मनोरंजन यांचा उत्तम समतोल साधला गेला आहे. इथे तारांगण खगोलशास्त्र आणि आपल्या आकाशगंगेतले  चमत्कार दाखवले जातात. याव्यतिरिक्त इथे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. (Worli Fort)
● अट्रिया मॉल
अट्रिया द मिलेनियम मॉल हा वरळीतला एक मॉल आहे. हा मॉल प्रामुख्याने त्याच्या मोठ्या डेकॅथलॉन स्टोअरसाठी आणि आयनॉक्स इन्सिग्निया येथील लक्झरी चित्रपट थिएटरसाठी ओळखला जातो. या मॉलमध्ये बार्बेक्यू नेशन, टॅप रेस्टो बार, बॉम्बे स्ट्रीट कंपनी, चायना गेट, मॅकडोनाल्ड्स आणि बरेच चांगले खाद्यपदार्थांचे पर्याय आहेत. (Worli Fort)
● वरळी किल्ला
ब्रिटीशांनी १६७५ साली बांधलेला हा किल्ला वरळी टेकडीवर आहे. हा एक सुंदर किल्ला आहे. हा किल्ला त्या काळी शत्रूच्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. या किल्ल्यावर जाण्यासाठी गावामधून पायी चालत जावं लागतं. (Worli Fort)
● महालक्ष्मी मंदिर
वरळीच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेलं हे महालक्ष्मी मंदिर भाविकांच्या आस्थेचं ठिकाण आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या मंदिराला भेट देतात. विशेषतः नवरात्रात इथे पुष्कळ गर्दी असते. (Worli Fort)
● स्लिंक आणि बार्डॉट
हा रेस्टोबार बाहेरून तसा साधाच दिसतो. आत गेल्यावर तुम्हाला एका संपूर्ण वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटेल. या रेस्टोबारमध्ये वातावरण अतिशय छान, आरामदायी आणि स्टायलिश आहे. इथलं युरोपियन फूड आणि कॉकटेल तर कधीच मिस करू नका. इथे जेवण झाल्यावर त्यांच्या स्पेशालिटी असलेल्या स्वीट डिशेस नक्की ट्राय करा. (Worli Fort)
● श्री केदारेश्वर महादेव मंदिर
केदारेश्वर महादेव मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे. हे मंदिर १८३२ साली बांधण्यात आलं होतं. तुम्ही महादेवाचे भक्त असाल आणि काही वेळ शांततेत घालवायचा असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. (Worli Fort)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.