Xavier’s College, Mumbai : मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज का आहे एवढं सुप्रसिद्ध?

146
Xavier's College, Mumbai : मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज का आहे एवढं सुप्रसिद्ध?

सेंट झेवियर्स या कॉलेजचं दक्षिण मुंबई इथलं कॅम्पस इंडो-गॉथिक शैलीतल्या वास्तुकलेनुसार बांधलं गेलं आहे. हे कॉलेज एक हेरीटेज वास्तू म्हणून ओळखलं जातं.

या कॉलेजची स्थापना १८६९ साली जर्मन जेसुइट्सने केली. झेवियर्स कॉलेजचा १८८४ ते १९१४ या सालादरम्यान झपाट्याने विकास झाला. या कॉलेजची सुरुवात एक कला संस्था म्हणून झाली. पण १९२० च्या दशकामध्ये विज्ञान विभागही होते. त्यानंतर पुढे १९३०च्या दशकामध्ये या कॉलेजचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. या कॉलेजमध्ये कला, विज्ञान, व्यवसाय, वाणिज्य आणि सार्वजनिक धोरणातला पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. याव्यतिरिक्त हे सेंट झेवियर्स कॉलेज ‘मल्हार’ नावाच्या इंटरकॉलेज युथ फेस्टिव्हसाठी ओळखलं जातं. (Xavier’s College, Mumbai)

(हेही वाचा – Rohit Sharma on Gambhir : रोहित शर्माने ‘या’ दोन शब्दांत केलं गौतम गंभीरचं वर्णन)

कॉलेजचा अभ्यासक्रम

२००७ सालापर्यंत हे सेंट झेवियर्स कॉलेज मुख्यतः एक अंडरग्रॅजुएट कॉलेज होतं. इथली विद्यार्थी संख्या २६४८ अंडरग्रॅजुएट विद्यार्थी आणि ९९ पदव्युत्तर विद्यार्थी एवढी आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवीसाठीचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने तयार केला आहे. त्या अभ्यासक्रमात मिड-टर्म टेस्ट्स आणि फायनल परीक्षांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विभागांमधला यशाचा सरासरी दर ९० ते १०० टक्के आहे. तसंच विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये ९५ ते १०० टक्के या दराने विद्यार्थी उत्तीर्ण होतात. या कॉलेजमध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित अर्जदार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विशेष सवलत दिली जाते.

कॉलेजतर्फे संचालित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये द लर्निंग फॉर लाइफ प्रोग्राम, ऑनर्स प्रोग्राम, सोशल इन्व्हॉल्व्हमेंट प्रोग्राम तसंच व्यक्तिमत्व आणि मानवी मूल्ये यांचा समावेश आहे. (Xavier’s College, Mumbai)

(हेही वाचा – Mercedes-Benz E-Class 2024 : मर्सिडिझची सगळ्यात लोकप्रिय लक्झरी कार ई क्लास येतेय नवीन अवतारात)

ज्युनिअर कॉलेज कोर्स

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंबई विभागीय मंडळाच्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एसएससी बोर्डाच्या परीक्षेतल्या गुणवत्तेवर मूल्यमापन केलं जातं.

इथे कॉमर्स शाखा ही नुकतीच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सुरू झाली आहे. आर्ट्स आणि सायन्स हे दोन्ही अनुदानित कोर्स आहेत. पण कॉमर्स अनुदानित नाही.

(हेही वाचा – Lalbaugcha Raja 2024 : २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन)

पदवीपूर्व पदवी कोर्स

पदव्युत्तर पदवीचा कोर्स हा तीन वर्षांचा असतो. मुंबई विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच एचएससी या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे त्यांचं मूल्यमापन केलं जातं. (Xavier’s College, Mumbai)

  • बॅचलर ऑफ आर्ट्स (B.A.)
  • बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी)
  • बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com.)
  • बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S.)
  • बॅचलर ऑफ मास मीडिया (B.M.M.)
  • बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (बीएससी आयटी)
  • बॅचलर ऑफ व्होकेशन – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
  • बॅचलर ऑफ व्होकेशन – टुरिझम
  • बॅचलर ऑफ कॉमर्स, अकाउंटिंग आणि फायनान्स (BAF)

(हेही वाचा – M. S. Dhoni : महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत घालवतोय सुट्टी; दिसला ‘या’ खेळाच्या मैदानावर )

पदव्युत्तर पदवी कोर्स
  • मास्टर ऑफ सायन्स (एमएससी)
  • डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) इन आर्ट्स अँड सायन्स
  • मास्टर्स ऑफ पब्लिक पॉलिसी (M.P.P)
  • डेटा सायन्स (PGDDS) पदव्युत्तर डिप्लोमा
डिप्लोमा कोर्स
  • क्लिनिकल रिसर्च
  • फॉरेन्सिक सायन्स
  • एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी
  • रत्नशास्त्र
  • इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजी आणि एंटरप्राईज (Xavier’s College, Mumbai)
सर्टिफिकेट कोर्स
  • डायमंड ग्रेडिंग
  • ज्वेलरी डिझायनिंग
  • डेटा ऍनालिसिस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.