Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra : शिओमी १५ मालिकेतील दोन नवीन फोन जागतिक बाजारपेठेत दाखल

Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra : शिओमी १५ अल्ट्राला बिगबॉय फोन म्हटलं जात आहे.

50
Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra : शिओमी १५ मालिकेतील दोन नवीन फोन जागतिक बाजारपेठेत दाखल
  • ऋजुता लुकतुके

या आठवड्यात स्पेनमध्ये बार्सिलोना इथं जागतिक स्मार्टफोन मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्याचं औचित्य साधून शिओमी या चिनी कंपनीनी आपली बहुप्रतिक्षित १५ मालिका बाजारात आणली आहे. शिओमी १५ आणि शिओमी १५ अल्ट्रा हे दोन फोन या मालिकेत आहेत. यातील अल्ट्रा फोनला तर बिगबॉय म्हटलं जात आहे. कारण, कंपनीचा हा महत्त्वाकांक्षी कॅमेरा फोन आहे. शिओमीने तीन वर्षांपूर्वी लिका कंपनीबरोबर कॅमेरासाठी करार केला आहे आणि तेव्हापासून कंपनीने आपल्या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. शिओमी १५ मालिकेतही खासकरून अल्ट्रामध्ये हेच दिसून येणार आहे. (Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra)

शिओमी १५ मालिकेत ट्रिपल कॅमेरा आहे आणि लाईट फ्युजन ९०० इमेज सेन्सर असलेला ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा ही या फोनची ओळख बनेल असाच आहे. कमीत कमी प्रकाशातही हा कॅमेरा चांगली कामगिरी करू शकतो. तर टेलिफोटो लेन्स आणि अल्ट्रावाईड रेंज असलेला कॅमेराही ५० मेगा पिक्सेलचाच आहे. अल्ट्रावाईडमध्ये ११५ अंशांचा नजारा कॅप्चर होऊ शकेल. (Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra)

(हेही वाचा – Mahakumbh मुळे रोजगार, आर्थिक उत्पन्न किती वाढलं ? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दिली आकडेवारी)

तांत्रिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर शिओमी १५ मालिकेतील फोन हे वजनाला हलके आहेत. शिओमी १५ फोन तर २०० ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा आहे आणि १५ अल्ट्रा यातील तीन कॅमेरा लेन्समुळे २२९ ग्रॅमच्या जवळपास आहे. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन एलिट सीओसी ही मायक्रोचिप वापरण्यात आली आहे. शिओमी १५ फोनचा डिस्प्ले ६.२३ इंचांचा आहे. तर १५ अल्ट्रा फोनचा डिस्प्ले ६.७३ इंचाचा आहे. अल्ट्रा फोनला ग्लास आवरणच आहे. त्यामुळे हाताळताना या फोनचा स्पर्श चांगला आहे. (Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra)

दोन्ही फोनची बॅटरी ५४१० एमएएच क्षमतेची आहे. तसंच फोनबरोबर ९० वॅट हायपरचार्ज वायर तसंच ८० वॅटचा वायरलेस चार्जर देण्यात आला आहे. भारतात हा फोन ११ मार्चला लाँच होणार आहे. तेव्हाच भारतातील या फोनची किंमत समजू शकेल. पण, सध्या युकेमध्ये फोन उपलब्ध आहे. आणि तिथे या फोनची किंमत ९१,००० रुपयांपासून सुरू होत आहे. तर अल्ट्रा फोनची किंमत ही १,३६,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. सॅमसंग गॅलेक्सी एस११ आणि गुगल पिक्सेल फोनची स्पर्धा या फोनला असेल. (Xiaomi 15 & Xiaomi 15 Ultra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.