Yamaha MT 07 : यामाहाच्या प्रिमिअम बाईकपैकी एक एमटी-०७ भारतीय रस्त्यांवर उतरणार 

यावर्षी यामाहा कंपनी आपल्या काही प्रिमिअम बाईक भारतात लाँच करणार आहे. 

195
Yamaha MT 07 : यामाहाच्या प्रिमिअम बाईकपैकी एक एमटी-०७ भारतीय रस्त्यांवर उतरणार 
  • ऋजुता लुकतुके

यामाहा ही जपानी कंपनी यंदाच्या वर्षी भारतात आपल्या प्रिमिअम श्रेणीतील बाईक उतरवणार आहे. अशा काही बाईक त्यांनी आपल्या डीलरसमोर पेशही केल्या आहेत. आणि त्यातलीच एक असेल नेकेड रोडस्टर एम ०७ ही बाईक. नावाप्रमाणे तिचं सगळं इंजिनिअरिंग अगदी इंजिनही डोळ्यासमोर दिसतं. तरुणाईला आकर्षित करेल असं या गाडीचं डिझाईन आहे. आणि गाडीच्या चाकांना आहेत फ्लूरोसंट रंगांचे आरे. लुक बद्दल बोलायचं झालं तर एम ०७ चं हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि आकाराने ती एखाद्या चित्त्यासारखी भासते. (Yamaha MT 07)

जागतिक स्तरावर ज्या सुविधा एम ०७ मध्ये आहेत तशीच बाईक भारतातही लाँच होणार आहे. म्हणजे गाडीच्या समोर एकच मोठा एलईडी हेडलँप असेल. गाडीची इंधनाची टाकी बाईकची ताकद प्रतीत करणारीच असेल. आणि समोरून गाडी अत्याधुनिक दिसेल याची काळजी कंपनीने घेतली आहे. गाडीचं शेपूटही आधुनिक, सस्पेन्सर खुबीने बसवलेला किंवा लपवलेला आणि हँडलही मोठं असेल. (Yamaha MT 07)

(हेही वाचा – PM Narendra Modi : जागतिक स्तरावर भारताविषयी अभूतपूर्व सकारात्मकता)

या बाईकशी असेल स्पर्धा 

या गाडीचं इंजिन ६८९ सीसी क्षमतेचं आहे. ६ स्पीडचा गिअरबॉक्स या गाडीत असेल. आणि इंजिन पूर्ण क्षमतेनं वापरात येईल तेव्हा ७२.४ अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण करू शकेल. यामाहा वायझेडएफ या गाडीतही हेच इंजिन आहे. गाडीत अलीकडे असतात तसे एलईडी दिवे बसवलेले असतील. आणि त्याचबरोबर चालक या बाईकशी आपला मोबाईल फोन ब्लूटूथने जोडू शकेल. याशिवाय बाईक घसरु नये यासाठी स्लिपर क्लचही बसवण्यात आला आहे. (Yamaha MT 07)

अशा या प्रिमिअम बाईकची किंमत ७ ते ८ लाखांच्या घरात असणार आहे. आणि या बाईकची स्पर्धा असेल ती होंडा सीबी६५०आर आणि ट्रायंफ ट्रायडंट ६६० या बाईकशी. (Yamaha MT 07)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.