Yavatmal : “यवतेश्वराची माळ” म्हणजे यवतमाळ जिल्हा कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे?

24
Yavatmal : "यवतेश्वराची माळ" म्हणजे यवतमाळ जिल्हा कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे?

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातला एक जिल्हा आहे. यवतमाळ हे मुंबईपासून ६७० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. यवतमाळ हे नाव तिथल्या बोलीभाषेत यवत म्हणजे डोंगर आणि माळ म्हणजे रांगा यावरून पडलं आहे. आणखी एक म्हणजे हा जिल्हा आसपासच्या परिसरापेक्षा उंच असलेल्या एका पठारावर वसलेला आहे.

यवतेश्वर म्हणजे महादेव उंच डोंगरावर वास करतात. या डोंगररांगा त्या यवतेश्वराची माळ म्हणून त्या जिल्ह्याला यवतमाळ असं नाव पडलं. (Yavatmal)

(हेही वाचा – Governor Nominated 12 MLC प्रकरणावरील उबाठाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)

यवतमाळचा इतिहास

१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्राचाच एक भाग बनला. त्याआधी १८६९ साली यवतमाळ नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली होती. पण त्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली. पुढे १८९४ साली ती नगरपरिषद पुन्हा स्थापन झाली.

अशा प्रकारे जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद बनली. ब्रिटिश राजवटीत एलियट नावाचा पहिला महापौर होता आणि लेफ्टनंट हेगे हे उपमहापौर होते. २ जानेवारी १९१४ ते ३१ मे १९३२ पर्यंत गोविंद पुनाजी बारी हे यवतमाळ नगरपरिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. त्यानंतर २२ डिसेंबर १९३४ साली नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक घेण्यात आली.

यवतमाळ येथे शकुंतला नावाची मिनी ट्रेन ही ब्रिटिश सरकारने कापसाची वाहतूक करण्यासाठी सुरू केली होती. पण ही ट्रेन आता बंद आहे. (Yavatmal)

(हेही वाचा – दिल्लीत आप-काँग्रेस आमनेसामने लढणार; Omar Abdullah म्हणाले, इंडी आघाडी बरखास्त करा…)

यवतमाळ कशासाठी ओळखलं जातं?

यवतमाळ शहर हे अनोख्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी ओळखलं जातं. याव्यतिरिक्त गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, हे सणही या शहरात अनोख्या पद्धतीने साजरे केले जातात. याव्यतिरिक्त ख्रिस्ती आणि नवबौद्ध समुदायाचेही सण साजरे करण्यात येतात. (Yavatmal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.