योग कोरोनाचा प्रभाव कमी करतो! आयुष मंत्रालयाचा विशेष कार्यक्रम!

येत्या 21 जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत, उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी योगाभ्यास हा लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी, योगाचा प्रचार-प्रसार करण्याचा उपक्रम केंद्रीय आयुष तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतला आहे.

118

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कोविडच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांविषयी लोकांच्या मनात चिंता असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या या वातावरणात, योगाभ्यासाचे बहुआयामी लाभ अनेकांसाठी फारच उपयुक्त ठरत असल्याचे सिध्द होत आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर त्यात संपूर्ण निरामय शरीर मनासाठी तसेच तणावमुक्त आयुष्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना असून रोज योगाभ्यास करणाऱ्यांना हे सगळे लाभ मिळत असतात. योगाभ्यासाच्या या आश्वासक आणि निरंतर मिळणाऱ्या लाभांच्या वैशिष्ट्यामुळे आज कोविडमुळे बदललेल्या जीवनशैलीतही दैनंदिन आयुष्यात तन-मनातच समतोल साधण्यासाठी योग उपयुक्त ठरू शकतो.

21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

येत्या 21 जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत, उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी योगाभ्यास हा लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी, योगाचा प्रचार-प्रसार करण्याचा उपक्रम केंद्रीय आयुष तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतला आहे. दोन्ही मंत्रालयाच्या समन्वयातून या निमित्त 2 मे 2021 रोजी एका आभासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक योग दिनाला 50 दिवस उरले असतांना या कार्यक्रमासोबतच योगदिनाची उलटगणती सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमात, क्रीडा मंत्री किरेन रिजीजू आणि विख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यात ‘खेळाडूंसाठी योगाचे महत्त्व’ या विषयावरील संवादाचे ध्वनीमुद्रित प्रसारणही करण्यात आले होते. प्रसिद्ध धावपटू अंजू बॉबी जॉर्ज, यांनीही योगाविषयी दिलेला संदेश यावेळी दाखवण्यात आला.

(हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!)

योगाचे महत्व!

नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. योगाभ्यासामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते, रक्तप्रवाह उत्तम राहतो आणि श्वसनाचे आजार, हृदयविकास, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. योगामुळे, मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि भावनिकदृष्ट्या देखील संतुलित होण्यास मदत मिळते. यामुळे, भीती, अस्वस्थता, तणाव, कंटाळा, नैराश्य आणि चीडचिडेपणा अशा सगळ्या विकारांवर मात करता येते. विशेषतः सध्याच्या संकटकाळात अनेकांना या अवस्थांचा सामना करावा लागतो आहे, त्यावर योगाभ्यास प्रभावी उपाय ठरू शकतो. आणि म्हणूनच लोकांच्या विचारांमध्ये तसेच त्यांच्या दैनंदिन आयुष्यात योगाभ्यास पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन, 2021 अत्यंत योग्य वेळी आलेला कार्यक्रम ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.