विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने विश्व मार्गक्रमण करत असते, त्यामध्ये मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये कायम संतुलन निर्माण होणे गरजेचे असते, त्यासाठी योगाच्या अनुषंगाने स्वास्थाची संकल्पना महत्वाची वाटते. योग हा शारीरिक आणि मानसिक दोन्हींचे संतुलन राखतो. याचा परिणाम म्हणून मानसिक आणि शारीरिक तणावापासून मुक्ती मिळते, योग हा आत्मिक शांतीचा मार्ग आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
हार्टफुलनेस या संस्थेने ‘एकता आणि स्वास्थ यासाठी योग’ असा उपक्रम सुरु केला आले. हार्टफुलनेस या संस्थेचे मार्गदर्शक आणि श्री रामचंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश पटेल (दाजी) यांच्या प्रयत्नाने या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पतंजलीचे योग गुरु रामदेव बाबा, आयुष्य मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा तसेच स्वामी विवेकानंद योग संस्थानचे संस्थापक डॉ. एच.आर. नागेंद्र हे उपस्थित होते.
(हेही वाचा : पाकिस्तानी ‘ललना’च्या जाळ्यात सापडला आणखी एक भारतीय जवान!)
हार्टफुलनेसचे अध्यक्ष कमलेश पटेल (दाजी) म्हणाले कि, भारतभूमी ही जीवनाच्या विविध पैलूंचे अध्ययन केंद्र आहे. म्हणूनच हार्टफुलनेस संस्था जगभरात योगाचा प्रचारप्रसार करते. त्यासाठी जगभरातील विविध संस्थांशी संयुक्त प्रयत्न करते. प्रत्येक व्यक्तीने याचा लाभ घेण्याची गरज आहे, असेही पटेल (दाजी) म्हणाले.
Join Our WhatsApp Community