चोरट्यांनी स्विच ऑफ केला तरी तुम्हाला फोन ट्रॅक करता येईल, ‘हे’ आहे भन्नाट APP

147

आजकाल स्मार्टफोन हे केवळ संपर्काचे माध्यम नाही, तर आपल्या शरीराचा एक अवयव झाला आहे. कॉल करण्यापासून ते बँकेचे व्यवहार किंवा शॉपिंग यांसारखी अनेक कामे स्मार्टफोनशिवाय रखडतात. त्यामुळे अगदी काही मिनिटांसाठी जरी आपल्याला आपला स्मार्टफोन नाही मिळाला, तरी आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं.

पण स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला की आपली सगळीच कामं थांबतात. पण आता चोरीला गेलेला मोबाईलही आपल्याला सहजपणे ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी एक अँड्रॉइड आपल्याला उपयोगी पडणार आहे.

(हेही वाचाः रेल्वे स्टेशनवरील पिचका-या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भन्नाट युक्ती)

अँड्रॉइड अॅपचा करा वापर

फोन चोरल्यानंतर चोरटे फोन स्विच ऑफ कुन त्यातील सिम कार्ड काढून टाकतात. त्यामुळे मग फोन ट्रॅक करणं अवघड जातं. त्यामुळे फोन चोरीला गेल्यानंतर पोलिसांची मदत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण Track it EVEN if it is off या अँड्रॉइड अॅपचा वापर करुन आपल्यालाही फोन ट्रॅक करणं सोपं जाणार आहे.

काय आहे फीचर?

गुगल प्ले वर Track it EVEN if it is off हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही परमिशन्सच्या आधारे ते आपल्याला वापरता येणार आहे. या अॅपमध्ये फिचर डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडचं फीचर आहे. त्यामुळे फोन स्विच ऑफ केल्यानंतरही तो पूर्णपणे बंद न होता, चोरट्यांची दिशाभूल केली जाते.

(हेही वाचाः ‘अरे ही तर कर्माची फळं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूने शोएब अख्तरची जिरवली)

अशी मिळेल सर्व माहिती

या अॅपद्वारे रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर आपल्या डिव्हाईसची संपूर्ण माहिती जसं की लोकेशन, चोरट्याचा सेल्फी हा युजरच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. त्यामुळे फोन चोरी झाल्यास या अॅपचा सर्वांना चांगलाच उपयोग होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.