Milk Facts: दूध पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या…

116

भारतीय डाएटमध्ये दूध एक महत्त्वाचे पेय आहे. मग वयस्कर असो, किंवा छोटी मुलं सर्वजण दूधाचा एक ग्लास रोज पिण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना दूध हे प्यायला दिले जाते. तर वयस्करांनी त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी दूध पिणे गरजेचे आहे. दूधात अनेक फ्लेवअर मिक्स करूनही प्यायले जाते. काही लोक दूध सकाळी पितात, तर काही लोक रात्री झोपण्यापूर्वीही पितात. परंतु तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहितीये का?

दूध पिण्याची योग्य वेळ काय?

आयुर्वेदानुसार, वयस्करांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ ही रात्री झोपण्यापूर्वीची आहे. तर मुलांनी सकाळी दूध प्यायलं पाहिजे. रात्री दूध प्यायल्याने ओजस वाढण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये ओजस एक अशी स्थिती असते, ज्याला योग्य पचनाची अवस्था ओळखले जाते. दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

दूध पिण्याचे फायदे

दूधात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रोटीन, कॅल्शिअल, व्हिटॅमिन- बी १२, व्हिटॅमिन-डी आणि फॉसफोरसचे दूध हे चांगले स्त्रोत आहे. रोज दूध प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढते, परंतु यामुळे छातीतही जळजळ होऊ शकते.

एका दिवसात किती दूध प्यायले हवे?

दिवसभरात २ ते ३ कप दूध पिऊ शकता, परंतु जास्त सेवन केल्यामुळे हानी पोहोचू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. जर तुम्ही फूल-क्रीम दूध पित आहात, तर एक किंवा दोन कपापेक्षा जास्त दूध पिऊ नका, नाहीतर वजन वाढू शकते.

(हेही वाचा – WhatsApp वर करता येणार काॅल रेकाॅर्ड; ‘या’ स्टेप्स करा फाॅलो)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.