तुम्हाला Energy Drinks पिण्याची सवय आहे? तर सावध व्हा, कारण…

सध्याचं जग हे इतकं फास्ट आहे की, लोकांना प्रत्येक गोष्टीचे परिणाम हे अगदी फास्ट हवे असतात. दैनंदिन जीवन जगत असताना कोणातच संयम राहिलेला नाही. अशा परिस्थितीत तरूण वर्गाने एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्सकडे वळणं हे काही आश्चर्यकारक नाही. हे एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्स प्यायल्यावर तुम्हाला झटपट एनर्जी मिळते. एनर्जी ड्रिंक्स पिणे हा आता जीवनशैलीचा एक भाग बनला असला तरी ते आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? तज्ज्ञांच्या मते, तुम्ही या एनर्जी ड्रिंक्सपासून शक्य तितके दूर राहिलेले उत्तम. हे एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्स तुम्हाला झटपट एनर्जी देत असतील, परंतु तेच दीर्घकाळासाठी हानी देखील पुरवतात.

(हेही वाचा – ‘या’ वेळेस चुकूनही पिऊ नका Green Tea, फायद्याऐवजी होईल तोटा!)

कॅफिनच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब होतो

एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते, ही एक चिंतेची बाब आहे. अर्धा लिटर एनर्जी ड्रिंकमध्ये किमान 200 ग्रॅम कॅफिन असते, जे 500 ग्रॅमपर्यंतही असू शकते. कॅफिनच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, भीती वाढणे आणि कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते.

टाइप 2 मधुमेहाचा धोका

एनर्जी ड्रिंक्समध्ये असणाऱ्या कॅफिनच्या उच्च डोससह साखरेचा उच्च डोस देखील आपल्या शरिरात जाते. त्यामुळे वजन वाढू शकते. एनर्जी ड्रिंकच्या अर्ध्या लिटर बॉटलमध्ये 220 कॅलरीज असतात. ज्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

अस्वस्थता वाढू शकते

काही लोकांमध्ये, आनुवंशिक कारणांमुळे चिंताग्रस्त, अस्वस्थतेची समस्या उद्भवू शकते. नियमितपणे एनर्जी ड्रिंक्स पिणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते आणि हे जास्त कॅफिनमुळे होते.

दातांच्या संबंधित समस्या

एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे तुमच्या दातांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामध्ये असलेली साखर तुमच्या दातांचा इनॅमल नष्ट करते, ज्यामुळे सेन्सिविटी, कीड इत्यादी समस्या सुरू होतात.

शरिरात पाण्याचा अंश कमी होणं

एनर्जी ड्रिंक्सचा वापर शरीरात झटपट एनर्जी निर्माण करण्यासाठी केला जातो. यामुळेच लोक व्यायाम करताना किंवा कोणताही खेळ खेळताना ते पितात. पाण्याऐवजी एनर्जी ड्रिंक्स पिण्यास सुरुवात केली तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. कॅफीनच्या उच्च पातळीमुळे तुमच्या मूत्रपिंडाचे कार्य बिघडते आणि शरीरात डिहायड्रेशन होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here