srikalahasti temple चे वैशिष्ट्य जाणून व्हाल थक्क!

60
srikalahasti temple चे वैशिष्ट्य जाणून व्हाल थक्क!

श्रीकालहस्ती मंदिर (srikalahasti temple) हे भारतात आंध्र प्रदेश राज्यामधल्या तिरुपती जिल्ह्यात असलेल्या श्रीकालहस्ती नावाच्या गावात आहे. इथल्या मान्यतेनुसार असं म्हटलं की, या ठिकाणी मंदिरातल्या शिवलिंगातून वाहणारं रक्त दिसू नये यासाठी कन्नप्पा नावाचे गृहस्थ आपले दोन्ही डोळे द्यायला तयार होते. पण त्याआधीच महादेवांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं आणि त्यांना मोक्ष दिला.

(हेही वाचा – Akhil Chitre यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश)

श्रीकालहस्ती (srikalahasti temple) इथल्या मंदिराचा आतला भाग ५व्या शतकाच्या आसपास बांधला गेला होता आणि मंदिराच्या बाहेरचा भाग ११व्या शतकामध्ये राजेंद्र चोळ पहिला आणि इतर चोळ सम्राट जसे की, राजदित्य चोल, राजराजा चोळ पहिला, राजाधिराजा चोळ पहिला, कुलोत्तुंगा चोळ पहिला, कुलोत्तुंगा चोळ दुसरा, कुलोत्तुंगा चोळ तिसरा यांनी बांधलं होतं. रेड्डी साम्राज्यात, विजयनगर साम्राज्यात १२० फूट उंच, मुख्य गोपुरम आणि गुंतागुंतीचे कोरीवकाम असणाऱ्या शंभर खांब असलेला सभामंडप १५१६ साली तयार करण्यात आला. विजयनगरावर कृष्णदेवरायांची राजवट होती.

(हेही वाचा – US Presidential Election 2024 : कमला हॅरिस यांच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे)

या मंदिरात वायूच्या रूपात महादेवांना श्रीकालहस्तेश्वर म्हणून पूजलं जातं. या मंदिराला राहु-केतू क्षेत्र आणि दक्षिणा कैलासम असंही मानलं जातं. हे मंदिर तिरुपतीपासून ३६ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. श्रीकालहस्ती मंदिर (srikalahasti temple) हे पंचमहाभूतांपैकी वायू म्हणजेच वाऱ्याचं प्रतिनिधित्व करणारं एक स्थान आहे. हे मंदिर वायू लिंगम किंवा पवन लिंगम म्हणूनही प्रसिद्ध आहे.

(हेही वाचा – US Presidential Election 2024 : ‘या’ १० गोष्टींमुळे साध्य झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय)

श्रीकालहस्ती मंदिराचं पौराणिक महत्त्व

असं म्हटलं जातं की, वायू देवता यांनी हजारो वर्षं कर्पूर लिंगम म्हणजेच कापूरापासून तयार केलेल्या शिवलिंगाची तपश्चर्या केली. वायू देवतेच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर महादेव प्रकट झाले आणि वायूदेवांना वर दिला. वायूदेव जगात सर्वत्र हवेच्या रूपामध्ये प्रत्येक सजीवासाठी त्याचा अविभाज्य भाग बनले. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. वायू हे त्या पंचमहाभूतांपैकीच एक महत्त्वाचं रूप आहे. श्रीकालहस्ती हे मंदिर (srikalahasti temple) पुराणकाळातल्या यांसारख्या कितीतरी घटनांचे साक्षीदार आहे.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule: घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा ‘मातोश्री‘त बसून वचननामा प्रकाशित!)

श्रीकालहस्ती मंदिराची संस्कृती

या मंदिरात शैव परंपरेचं पालन केलं जातं. इथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक लाखोंच्या संख्येने महादेवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी इथे येतात. महाशिवरात्रीचा ब्रह्मोत्सव तेरा दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये महादेव आणि पार्वती देवींच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.