पालघर जिल्ह्यातील सेवा विवेक प्रकल्पावर तरुण शेतकऱ्याने केली स्ट्रॉबेरीची शेती

147

स्ट्रॉबेरीचे उत्पन्न प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये घेतले जाते. परंतु आता पालघर जिल्ह्यातील सेवा विवेकच्या प्रकल्पावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यास तरुण शेतकरी राकेश अधिकारी यांना यश आले आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्र कर्नाटकात ईडीची छापेमारी! ७० कोटींची मालमत्ता जप्त)

सेवा विवेक प्रकल्पावर विविध भाज्या, फळभाज्या, तांदूळ, बाजरी, मका, कलिंगड, राई यांची शेती केली जाते. पहिल्यांदाच स्ट्रॉबेरी लावण्याचा प्रयोग राकेश अधिकारी यांनी दोन महिन्यापूर्वी हाती घेतला. मागील दोन महिन्यांपासून स्ट्रॉबेरीच्या शेतावर घेतलेली त्यांची मेहनत अखेर यशस्वी झाली आहे. मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्यात आले. प्रकल्पावर भेट देणाऱ्या विविध पर्यटकांना तसेच पाहुण्यांना स्ट्रॉबेरीची शेती पाहून आश्चर्य वाटते. वातवरणातील गारवा आणि स्ट्रॉबेरीचे शेत त्यामुळे पर्यटकांना महाबळेश्वरला आल्यासारखे वाटते.

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा तसेच यातून महिलांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.

  • स्ट्रॉबेरी varity -स्वीट सेन्सशन
  • लागवड-16 नोव्हेंबर 2022
  • लागवड पद्धत-सेंद्रिय शेती ( organik farming)
  • Malching paper अणि drip Irrigation Sytam use.
  • स्ट्रॉबेरी रोप- per plants cost 13rs – 1000 रोपे लावली.
  • 3- 4 गुंठे जमिनीचा वापर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.