कारने फिरायला कोणाला आवडत नाही? आपली कार असेल तर आपण कोणत्याही सीझनमध्ये हवे तिथे आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या पाळीव प्राण्यांबरोबर फिरायला जाता येते. पण सगळी मज्जा मस्ती करताना कारची स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे हे विसरून चालणार नाही. नाहीतर कारमध्ये दुर्गंधी पसरून राहते आणि कुबटपणा जाणवतो. त्यासाठी अनेक लोक कार परफ्यूम वापरतात.
बऱ्याच वेळेस लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोबत असले तर कारमध्ये इतर वेळेपेक्षा जास्त कचरा होणे तसेच पाणी सांडणे होते आणि त्यामुळे दुर्गंधी पसरू शकते. तसेच कारमध्ये स्मोक करणे, कार रोजच्या रोज स्वच्छ न करणे हीसुद्धा दुर्गंधी पसरण्याची कारणे असू शकतात.
(हेही वाचा Sanatan Sanstha : दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा जयघोष !)
कारमध्ये येणारी दुर्गंधी आणि कुबटपणा घालवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे ड्राईव्ह करताना कारच्या काचा उघड्या ठेवणे. तसे केल्याने बाहेरची ताजी हवा सतत आत येत राहते आणि त्यामुळे कारमधली दुर्गंधी आणि कुबटपणा नाहीसा होतो. तसेच रोजच्या रोज तुम्ही तुमची कार स्वच्छ करायला हवी. त्यातला सगळा कचरा जसे की, सिगारेटचे तुकडे, चिप्सचे रॅपर, कॉफी किंवा चहाचे कप इत्यादी. सर्वात आधी बाहेर काढून टाकावे.
तसेच बेकिंग सोड्याचा वापर करूनही तुम्ही कारची दुर्गंधी घालवू शकता. त्यासाठी एका उघड्या कंटेनरमध्ये थोडा बेकिंग सोडा ठेवावा. यामुळे दुर्गंधी आपोआपच कमी होते. तसेच तुम्ही व्हाईट व्हिनेगर वापरून कारची दुर्गंधी घालवू शकता. त्यासाठी जेवढे व्हिनेगर घ्याल त्याच्या दोन पट पाणी त्यात मिक्स करा आणि त्याने तुमची कार स्वच्छ कापडाने किंवा स्पॉंजने पुसून काढा. काही वेळासाठी कारचे दरवाजे आणि काचा उघड्या करून ठेवा. याने दुर्गंधी नाहीशी होते.
Join Our WhatsApp Community