Google Pay हे अ‍ॅप ओपन न करताच पूर्ण होईल तुमचे पेमेंट; काय आहे हे नवे फिचर

203

गुगल पे ( Google pay) या अ‍ॅपने पाईन लॅबच्या सहकार्याने एक नवे फिचर जारी केले आहे. याद्वारे युपीआयसाठी टॅप टू पे ही पद्धत आपल्याला वापरता येईल. आतापर्यंत टॅप टू पे (Tap to Pay) ही सुविधा केवळ कार्ड पेमेंटसाठी उपलब्ध होती. परंतु यापुढे आपल्याला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी गुगल पे हा अ‍ॅप ओपन करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही मशिनने फोनला फक्त टच केले तरी काही सेकंदात पेमेंट केले जाईल.

ही सुविधा सध्या रिलायन्स रिटेलमध्ये सुरू करण्यात आली असून भविष्यात स्टारबक्ससह इतर व्यापाऱ्यांकडेही ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. हे नवे फिचर युजर्सला योग्यरित्या समजावे याकरता गुगलने एक हेल्प पेज देखील लॉंच केले आहे. जर तुम्हालाही टॅप टू पे फिचर वापरायचे असेल तर तुमच्या अ‍ॅंड्रॉइड स्मार्टपोनमध्ये एनएफसी सुविधा आहे का ते तपासा.

( हेही वाचा : तुम्ही कोणत्या प्रकारच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवताय? अन्यथा होऊ शकतो आरोग्यावर परिणाम)

एनएफसी फिचर आहे का हे कसे तपासाल

  • अ‍ॅंड्रॉइड फोनवरील सेटिंग्ज उघडा.
  • अ‍ॅंड्रॉइड फोनमधील कनेक्शन सेटिंग्जमध्ये एनएफसी फिचर असते. हे फिचर उपलब्ध असल्यास एनएफसी आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही एनएफसी हे फिचर अ‍ॅक्टिव्ह करू शकता.

गुगल पे द्वारे ( Tap to pay ) पैसे कसे पाठवाल?

  • तुमचा स्मार्टफोन अनलॉक करा त्यानंतर पेमेंट टर्मिनलवर फोन टॅप करा
  • गुगल पे ओपन होईल
  • यानंतर NEXT पर्याय करून टॅप करा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.