श्रीवल्ली ते कच्चा बादाम… २०२२ मध्ये ‘या’ व्हिडिओंनी गाजवलं Youtube, गुगलने जारी केली यादी

170

अलिकडे कोणताही व्हिडिओ, जेवणाची रेसिपी आपण लगेच युट्यूबवर सर्च करतो. त्यामुळे युट्यूबची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता गुगलने युट्यूबवर २०२२ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडिओंची यादी जाहिर केली आहे. या वर्षात भारतात सर्वाधिक काय पाहिले गेले याची यादी गुगलने ब्लॉग पोस्टद्वारे शेअर केली आहे.

( हेही वाचा : गृहिणींचे बजेट कोलमडले! गायीचे दूध प्रतिलिटर ३ रुपयांनी महागले)

गुगलने भारतातील टॉप १० व्हिडिओ, टॉप १० म्युझिक व्हिडिओ आणि टॉप १० युट्यूब शॉर्ट्स क्रिएटर यांची यादी जाहीर केली आहे. युट्यूब इंडियाच्या टॉप ट्रेंडिंग कंटेंट कॅटेगरीमध्ये यावर्षी एज ऑफ वॉटर (Age Of Water) हा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर आहे. round 2 hell या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आहे. या चॅनलचे २८ दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

म्युझिक व्हिडिओ कॅटेगरीमध्ये पुष्पाची बाजी 

म्युझिक व्हिडिओ आणि गाण्यांच्या कॅटेगरीमध्ये यंदा पुष्पा चित्रपटाने बाजी मारली आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणे युट्यूबच्या टॉप १० लोकप्रिय गाण्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे. अरेबिक कुठू हे दक्षिण भारतातील गाणे दुसऱ्या स्थानी, पुष्पामधील सामी-सामी गाणे तिसऱ्या स्थानी तर भुवन बड्याकरचं कच्चा बादाम गाणे चौथ्या क्रमांकावर आहे.

पहा संपूर्ण यादी…

New Project 10 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.