- ऋजुता लुकतुके
मनोरंजन क्षेत्रात हल्ली मोठी उलथापाल होत आहे. रिलायन्स आणि डिस्नी-हॉटस्टार यांचं विलिनीकरण नुकतचं पार पडलं आहे. दोघांची मिळून एक नवीन कंपनी स्थापन करण्याची तयारी आता सुरू आहे. तर दुसरीकडे सोनी आणि झी या दोन कंपन्यांचं विलिनीकरण मात्र थांबवावं लागलं. त्यानंतर झी समुह काही संकटांमधून जात आहे. त्यामुळेच झी चे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांच्यावर दडपण होतं कंपनीचं कार्यकारी कामकाज पुन्हा मार्गी लावण्याचं. त्यानंतर सुभाष चंद्रा यांचा मुलगा पुनीत गोयंकाने एक मोठा निर्णय अलीकडे जाहीर केला आहे. पुनीत यांनी झी एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीनामा दिला आहे. अर्थात, झी च्या संचालक मंडळावर ते कायम असतील. आणि तिथे त्यांची जबाबदारी कंपनीची घडी नीट बसवणं हीच असेल. या बातमीनंतर झी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसांत साडे चार टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी शेअरमध्ये मामुली घसरण होऊन तो ११६.९५ अंशांवर बंद झाला आहे. (Zee share price)
(हेही वाचा – Larsen and toubro share price : एल अँड टी कंपनीचा शेअर अलीकडे एवढा का वाढला?)
झी लिमिटेड कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या पत्रकानुसार, १८ नोव्हेंबरलाच पुनीत गोयंका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्याचबरोबर कंपनीने मुख्य वित्तीय अधिकारी मुकुंद गलगली यांच्यावर सध्या सहाय्यक सीईओची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुनीत गोयंका हे कंपनीचे सीईओ असणार आहेत आणि तिथेच त्यांची खरी गरज असल्याचं संचालक मंडळानेच बोलून दाखवलं होतं. त्यानुसार, हा बदल करण्यात आला आहे. (Zee share price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community