आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण

कोकणातील विविध पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो पर्यटक भेट येतात. मागील काही वर्षांपासून कोकणाच्या पर्यटनात वाढ झाली असून या पार्श्वभूमीवर पर्यटकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. निळाशार समुद्राच्या लाटांचे विहंगम दृश्य ७० फूट उंचावरून पाहण्याचा निर्भेळ आनंद पर्यटकांना मिळावा यासाठी झिप-लाईन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे आणि देवगड समुद्रकिनारी सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा : स्मार्ट फोनवरून काही मिनिटात करा आधार कार्ड अपडेट )

झिप-लाईन प्रकल्प

समुद्रकिनार्‍याच्या वरती झिपलाइन केल्याने एका बाजूला सुंदर समुद्रकिनारा आणि दुसरीकडे हिरवीगार झाडे अशा कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो.

कोकणचे निसर्गसौंदर्य सर्वश्रूत आहे. कोकणचे सौंदर्य अबाधित ठेवत, महाराष्ट्र पर्यटनाकडून कोकणात बीच शॅक्स धोरण, स्कूबा डायव्हिंगसाठी आरमार बोट, साहसी पर्यटन धोरण राबवण्यात येत आहे. २०१९ पासून महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय ट्वीटरवर, इन्स्टाग्राम, फेसबुक या अॅप्सवर सक्रिय झाले आहे. विविध ट्रॅव्हल ब्लॉगर (Influencer, collaborator) यांच्या मदतीने महाराष्ट्र पर्यटन प्रमोट करण्यात येत आहे. इन्स्टाग्राम रिल्स, ट्वीटर ट्रेंड यामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

लाटांचे विहंगम दृश्य

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here