Zomato Project : आता दुसऱ्या शहरांमधून मागवता येतील पदार्थ; झोमॅटोने खाद्यप्रेमींसाठी लॉंच केला ‘इंटरसिटी लीजेंड’ प्रकल्प

137

झोमॅटो (Zomato) हे लोकप्रिय ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप आहे. घरबसल्या जेवण ऑर्डर करायचे असल्यास आपण झोमॅटो या अ‍ॅपचा वापर करतो. आतापर्यंत जवळपासच्या हॉटेलमधून आपल्याला आवडचे पदार्थ मागवता यायचे परंतु आता खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून झोमॅटोने Legends नावाने इंटरसिटी फूड डिलिव्हरीचा पायलट प्रोजेक्ट लॉंच केला आहे.

( हेही वाचा : First AC Train : भारतात १ सप्टेंबरला धावली होती पहिली एसी ट्रेन! कोच थंड करण्यासाठी केला होता असा जुगाड )

या Legends पायलट प्रोजेक्टद्वारे तुम्ही झोमॅटोद्वारे दुसऱ्या शहरांमधून खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकता. कंपनी या प्रोजेक्टद्वारे दिल्ली-एनसीआरच्या काही भागात आणि हैदराबाद, लखनौ या शहरांमधील हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करेल आणि या खाद्यपदार्थांचे योग्य ते पॅकिंग करून हे पार्सल विमानाने इतर शहरांमध्ये पोहोचवले जाईल. प्रवासादरम्यान जेवण खराब होऊ नये म्हणून मोबाईल फ्रिजचा वापर केला जाईल.

१०० हून अधिक विमानतळ आणि अनेक मोठे फूड पॉईंट्स या प्रकल्पाअंतर्गत आणले जातील. या प्रकल्पाला ‘इंटरसिटी लीजेंड’ असे नाव देण्यात आले आहे.

कसा असेल प्रकल्प?

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून अन्न तयार केल्यावर ते रियुजेबल आणि टॅम्पर-प्रूफ कंटेनरमध्ये पॅक केले जाईल जेणेकरून हवाई वाहतूक दरम्यान हे पदार्थ सुरक्षित राहतील. ऑनलाईन फूड डिलिव्हरीसोबतच किराणा सामान डिलिव्हर करण्याचे काम झोमॅटो करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.