-
ऋजुता लुकतुके
घरपोच अन्नपदार्थ पोहोचवणारी देशातील पहिली कंपनी असलेली झोमॅटो कंपनी आयपीओ नंतर शेअर बाजारात काही काळ धुमाकूळ घालत होती. पण, मागचा एक महिना आणि त्यातही या आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागच्या एका महिन्यात या शेअरमध्ये १८ टक्क्यांची घसरण झाली आहे. झोमॅटो कंपनी आता अन्नपदार्थ पोहोचवण्याबरोबरच क्विक कॉमर्स क्षेत्रात उतरली आहे. आणि या क्षेत्रात भारतात वाढत असलेली स्पर्धा पाहता जेफरीज या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं या शेअरवरील आपला अंदाज खरेदी करा वरून कायम ठेवा म्हणजे होल्डवर आणला. आणि यापूर्वी त्यांनी निर्धारित केलेलं ३२५ अंशांचं लक्ष्य कमी करून ते २७५ वर आणलं त्यानंतर शेअरमध्ये सुरू झालेली पडझड अजून थांबलेली नाही. (Zomato Share Price)
(हेही वाचा- इस्कॉननंतर आता Maha Kumbh Mela 2025 मध्ये अदाणी समूह गीता प्रेससह सनातन साहित्याचे मोफत वाटप करणार)
मागच्या पाच दिवसांत शेअर ११ टक्क्यांनी पडला आहे. तर शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर दोन अंशांच्या घसरणीसह २४३.२५ वर बंद झाला. (Zomato Share Price)
झोमॅटो कंपनीने क्विक कॉमर्समध्ये ब्लिंक-इट या आपल्या सेवेसह जोरदार विस्ताराच्या योजना आखल्या आहेत. पण, त्यांना ॲमेझॉन, स्विगी, झेप्टो यांची मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धा लक्षात घेता जेफरीजने आपलं रेटिंग कमी केलं आहे. कंपनीच्या नफ्यावर स्पर्धेचा विपरित परिणाम होईल अशं जेफरीजना वाटतं. (Zomato Share Price)
(हेही वाचा- आरेतील झाडे तोडू नका; Supreme Court ने मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला दिले आदेश)
दुसरीकडे बर्नस्टाईन या आणखी एका जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेनं झोमॅटोवर आऊटपरफॉर्म शेरा दिला आहे. ब्लिंक-इट ही सेवाही देशातील सध्या अव्वल सेवा आहे. त्यामुळे स्पर्धेतही झोमॅटोला फायदा मिळेल, असा बर्नस्टाईनचा अंदाज आहे. २०२५ साली ब्लिंक-इट सेवा ४० ते ५० शहरांमध्ये पोहोचेल, ही जमेची बाजू असल्याचं बर्नस्टाईनला वाटतं. त्यामुळे त्यांनी या शेअरसाठी ३३५ रुपयांचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. (Zomato Share Price)
आनंद राठी या देशांतर्गत संशोधन संस्थेनं झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही कंपन्यांसाठी बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. आणि अनुक्रमे ३८५, ७०५ रुपयांचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. (Zomato Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community