Abhijeet Bichukale विधानसभा निवडणूक लढणार; म्हणाले, ‘…तर मी सर्वांचे सोनं करणार’

53
Abhijeet Bichukale विधानसभा निवडणूक लढणार; म्हणाले, ‘…तर मी सर्वांचे सोनं करणार’
Abhijeet Bichukale विधानसभा निवडणूक लढणार; म्हणाले, ‘…तर मी सर्वांचे सोनं करणार’

महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे पुढील दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष मारणार बाजी? RSS चा 288 जागांचा सर्व्हे आला समोर)

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी यावेळी सातारा-जावळी मतदारसंघ निवडला आहे. अभिजीत बिचुकले यांची उमेदवारी लढवण्याची ही चौथी टर्म आहे. यावेळी ते सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. “अभिजीत बिचुकले निवडून आले तर नवीन उमेद येईल. नवीन आशा येईल. नवीन धोरणे येतील आणि महाराष्ट्रात साताऱ्याचा डंका वाजेल.” असा दावा बिचुकले यांनी केला आहे. (Abhijeet Bichukale)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या पाठोपाठ आता जळगावात सापडली रोकड!)

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाले, “2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मध्ये माझी आदित्य ठाकरे यांच्यासोबत लढत झाली होती. आता सातारा जावळी मतदारसंघांमध्ये मतदारांना सुवर्णसंधी देत आहे. 2004 पासून सलग चार टर्म मी ही निवडणूक लढत आहे. विकासाच्या दृष्टीने विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बिचुकले अशी लढत पाहायला मिळेल. सर्व सातारकरांनी मागील वेळी ज्याप्रमाणे उदयनराजेंचा पराभव केला होता त्याप्रमाणे आता मला विधानसभेत निवडून द्या.”

(हेही वाचा-Assembly Election : कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा; शिवसेना निवडणूक आयोगाला देणार निवेदन)

“मी जर 288 आमदारांमध्ये जाऊन बसलो तर मी सर्वांचे सोनं करणार. मी कुणाच्या पाठीमागे फिरत नाही. माझी स्वतःची ओळख आहे. मी कोणत्या पक्षाच्या पाठीमागे फिरत नाही. तुम्ही तुमची मतं विकू नका. आणि मला निवडून द्या. जेणेकरून मी साताऱ्याची अस्मिता राखेन. साताऱ्याचा विकास झाला आहे का? हे तुम्हीच सांगा. दोन्ही राजांच्या मनात आलं की ते विभक्त होतात आणि नंतर मनोमिलनही करतात. एमआयडीसीचा प्रश्न आहे. मी ब्रँड बिचुकले झालो आहे. मी निवडून आलो तर महाराष्ट्रात साताऱ्याचा डंका वाजेल.” असं ते म्हणाले आहेत. (Abhijeet Bichukale)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.