महायुतीचं सरकार येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार; Ajit Pawar यांनी व्यक्त केला विश्वास

83
महायुतीचं सरकार येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार; Ajit Pawar यांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीचं सरकार येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार; Ajit Pawar यांनी व्यक्त केला विश्वास

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येईल आणि त्यामध्ये आपल्याला मोठे पद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) बारामती (Baramati) तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार”
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार. ते सरकार आल्यानंतर आपल्याला तिकडे चांगलं पद मिळणार… मिळणार… मिळणार…” असे अजित पवार यांनी म्हटले.

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना
यावर कार्यकर्त्यापैकी एकाने लगेचच म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, असे म्हटले. त्यावर अजित पवार हसले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्या. महिलांना सांगा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना बंद होणार नाही, हे सांगा, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. (Ajit Pawar)

जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गाव भेट दौरा आखला आहे. या दौऱ्यात 59 गावांना भेटी अजित पवार देणार आहेत. मतदारांना सरकारची भूमिका सरकारने आणलेल्या योजना अजित पवार समजावून सांगत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.