Ajit Pawar: “साहेबांना खुश केलं आता मला खुश करा”, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

73
Ajit Pawar:
Ajit Pawar: "साहेबांना खुश केलं आता मला खुश करा", अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) बारामती (Baramati) तालुक्यातील 27 गावांना भेटी देणार आहेत. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना आवाहन केले आहे. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? सी-व्होटरचा सर्व्हे काय सांगतो?)

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “सावळकरांनो मला माहिती आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या मनात काय होतं ते तुम्ही बोलत नव्हता पण तुमच्या तुमच्या मधला अंदाज कळत होता. काही लोक म्हणायचे साहेब वडीलधारे आहेत. सुप्रियाताई पडल्या तर साहेबांना कसं वाटेल त्यामुळे आपण ताईला मतदान करू. त्यानुसार तुम्ही मतदान देखील केलं ते देखील मी स्वीकारलं. लोकसभेला ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. माझाही तुमच्यावर तेवढा अधिकार आहे. लोकसभेला ताई आहे, विधानसभेला दादा आहे. आता विधानसभेला दादाला खुश करा. तालुक्याचा विकास ते त्यांच्या परीने करतील मी माझ्या परीने करेल. माझ्याकडे जास्त आमदार आहेत त्यामुळे पक्ष मला मिळाला मी पक्षाचा अध्यक्ष झालो.”

(हेही वाचा-“तुमचा बाबा सिद्दिकी करू…”, मुख्यमंत्री Yogi Adityanath यांना जिवे मारण्याची धमकी)

उदाहरण देत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, समजा सावळगावात एक ट्रस्ट आहे. त्यापैकी त्यामध्ये त्या ट्रस्टचे 15 सदस्य आहेत. त्यातील 11 सदस्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला 4 सदस्य मग तो कोणाच्या बाजूला जाणार, तर तो 11 सदस्य असणाऱ्याकडे ट्रस्ट राहणार. त्या ठिकाणी बहुमताला आधार आहे. त्यामुळे कारण नसताना कुठेही भावनिक होऊ नका. आधीपासून मी, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आम्ही आम्ही सगळे मिळून किती वर्ष झाले इथे काम करतो आहे. आम्हाला कोणाचाही अनादर करायचा नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आहे. म्हणून मी मुद्दाम गाव भेट दौरा आखला. मी जवळपास 35 वर्षे काम करतो आहे. असं ते म्हणाले.

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.