Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी

81
Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी
Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक (Sana Malik) यांना यंदा अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली. (maharashtra assembly election 2024)

(हेही वाचा – Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी)

कोण आहेत उमेदवार

तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके

ही यादी जाहीर झाल्यामुळे अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.