३० वर्षे मला साथ दिलीत, ३० वर्षे अजित पवारांना साथ दिलीत आणि पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) आहेत. त्यांची ३० वर्ष झाली. आता ते म्हणतात की, मी कोणत्याही निवडणुकीत उभा रहाणार नाही. ते माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. ते ८५ वर्षांचे आहेत आणि ते मला आता रिटायर करायला निघालेत. ते मात्र ८५ वर्षांपर्यंत काम करू शकतात, हा कोणता न्याय?”, असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar on Sharad Pawar)
(हेही वाचा – परीक्षार्थीचे गुण ही खाजगी माहिती नाही; Bombay High Court चा निर्वाळा)
बारामती विधानसभा मतदारसंघामुळे (Baramati Vidhan Sabha 2024) काका-पुतणे सातत्याने चर्चेत असतात. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे केले आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या सूत्रावरून वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या पेक्षा खालच्या पिढीतील उमेदवार देऊन त्यांच्यावरच खेळ उलटवण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या अन् तरुण उमेदवारांना संधी द्यायला हवी, असे शरद पवार म्हणाले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात आता तरुण नेतृत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. यावरून अजित पवारांनी (Ajit Pawar) एका मुलाखतीत बोलतांना ही प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली पाहिजे
“शरद पवारांनी काही जुन्या नव्यांना घेऊन काम केलं आहे. मीही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. असं करावंच लागतं. कारण नवे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. त्यांच्यात स्पार्क आहेत कि नाही, हेही पाहावं लागतं”, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community