- विशेष प्रतिनिधी,मुंबई
माहीम कोळीवाड्यातील एका कोळी महिलेने शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना प्रचारात जाब विचारत अपमान करण्याचा प्रकार केल्यानंतर आता सरवणकर यांच्यासाठी त्यांची मुलगी मैदानात उतरली आहे. सरवणकर यांच्या प्रचाराची धुराच आता प्रिया सरवणकर गुरव यांनी हाती घेत अमित ठाकरे, महेश सावंत यांच्यासह उबाठा शिवसेनेच्या सर्वच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समाचार घेत त्यांचे सर्वच काढून टाकले. (Assembly Elections 2024)
राजपुत्र हवाय का सेवक हवाय?
माहीमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी प्रभादेवी येथील जाहीर सभेत त्यांची मुलगी आणि शिवसेना माहीम महिला विभागप्रमुख प्रिया सरवणकर (Priya Sarvankar) यांनी केलेल्या भाषणाची जारेदार चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रभादेवीतील भाषणांत प्रिया सरवणकर (Priya Sarvankar) यांनी मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला. नवीन चेहर असे मनसेकडून प्रमोशन केले जात आहे. मनसे काय पिक्चर काढते का असा सवाल करत ज्याला गल्लीतील पाच समस्या मांडता येत नाही तो नवीन चेहरा आपल्याला हवाय का? नेता म्हटला म्हणजे त्याच्याकडे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व हवे. आडनाव हे कर्तृत्व असू शकते का असा सवाल करत त्यांनी काही केले का? त्याला करणार का आमदार? एका युवराजाला निवडून दिल्याने लोकांना प्रश्चाताप होत आहे. लोकांना राज पुत्र नको. राजा नको तर जनतेची सेवा करणारा सेवक हवाय असे सांगत मनसेचा समचार घेतला. (Assembly Elections 2024)
(हेही वाचा – एकीकडे देशभक्त, दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान गाणारे लोक; संभाजीनगरमध्ये PM Narendra Modi यांचा विरोधकांवर हल्लाबोल)
पराभवाची हॅट्रीक माहिमकरच करेल
उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचा समाचार घेताना प्रिया सरवणकर (Priya Sarvankar) यांनी काँग्रेसमध्ये मान खाली घालून गेलो होतो,असे सांगितले. पण आज उध्दव ठाकरे हे काँग्रेससोबतच आहे, मग आता मान कापून टाक, असे सांगत मी त्या आमदाराला निवडून आणले, मी त्यांची शिडी बनलो असे जो सांगतो तो एकदा काँग्रेसमधून आणि एकदा शिवसेनेच्या विरोधात राहून का पडला? शिडी होतास ना असा सवाल करत जिधर बोजा, उधर सोजा असाच टोला त्यांनी उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला मारला. यावेळी प्रत्येक निवडणुकी कशाप्रकारे पडला आणि वाकडी चाळ ते दादरच्या प्रवासाबाबत त्यांनी प्रश्नही उपस्थित केले. यावेळी त्यांचा उल्लेख हप्ताखोर असा करत दोन वेळा प्रभादेवीकरांनी पाडले, आता तिसऱ्या वेळा पराभवाची हॅट्रीक माहीमकर करणार असेही त्यांनी सांगितले. (Assembly Elections 2024)
(हेही वाचा – Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल)
वाघीण नव्हेतर मांजर
शेर चले बाजार, कुत्ते भौके हजार असे सांगत माजी महापौर विशाखा राऊत यांचा उल्लेख दादरचा काकुबाई असा केला. त्या म्हणाल्या दुसऱ्याची प्रॉपटी मोजणाऱ्या काकुबाईंचा समुद्र किनारी बंगला आहे,असे सांगितले. माझ्यातील ताकद किंवा मी केवळ त्यांच्यामुळेच चार्ज झाल्याचेही त्यांनी सांगितले. माहीम विधानसभेतून मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे उभी राहीली नाही. पण वाघाच्या समोर उभे राहायला वाघाचे काळीज लागते. या काकू वाघीण नाही तर मांजर असा उल्लेख करत प्रिया सरवणकर यांनी श्री सिध्दीविनायकच त्यांचा हिशोब करेल असे सांगितले. (Assembly Elections 2024)
आम्हाला त्याचा गर्व आहे
पक्षात झेंडे लावणारा शाखाप्रमुख बनला आणि गावी बंगला बांधला, वडे विकणाऱ्याचे हॉटेल आहे. सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आपल्यासोबत राहणाऱ्यांना मोठे केले आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण तुम्ही किती जणांना मोठे केला असाही सवाल त्यांनी नाव न घेता विशाखा राऊत यांना केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community