Assembly Elections 2024 : बंडोबांना केले जाईल थंड की मैत्रीपूर्ण या गोंडस नावाखाली सर्वकाही सामावून जाईल ?

96
Assembly Election 2024 : उबाठा शिवसेना, काँग्रेसमध्ये घोळात घोळ; जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की

विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेले नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंड झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत अजूनही एकमत झाले नसल्याने दोन-तीन जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही जागा हव्या असल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून अनेक ठिकाणी जागावाटपाच्या आधीच उमेदवार देऊन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाच्या अनेक जागांवर उबाठा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार शिवसेना उबाठाच्या विरोधात काँग्रेसचे मधु चव्हाण हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आहेत. तर याचाच वचपा काढण्यासाठी धारावी विधानसभा मतदारसंघात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाने बाबुराव माने यांना उमेदवारी अर्ज भरण्यास एबी फॉर्म दिला आहे.

(हेही वाचा – Bomb Threat : राममंदिर, महाकाल मंदिर आणि तिरुपती मंदिराला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा झाल्या सतर्क)

भाजपाच्या वतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार असा आक्षेप घेत संजय उपाध्याय यांच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार तसेच या भागातील माजी आमदार गोपाळ शेट्टी यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात उमेदवार आयात करत शायना एन सी यांच्या विरोधात भाजपाचे अतुल शहा अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे. वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाचे कुणाल सरपोतदार जीशान सिद्दिकी यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करत आहेत. शिवाजीनगर मानखुर्द गोवंडीतून नवाब मलिक , दक्षिण सोलापूर येथे काँग्रेसचे दिलीप माने विरुद्ध उबाठा गट अमर पाटील, रामटेक विधानसभा काँग्रेसचे राजेंद्र मुळक विरुद्ध उबाठा गटाचे विशाल बरवटे, बीड विधानसभेत ज्योती मेटे, मोर्शी विधानसभेत अजित देवेंद्र भुयार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाविरुद्ध उमेश यावलकर भाजपा, अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अविनाश राणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सना मलिक यांच्यात लढत होणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित)

ऐरोली विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेना पक्षाचे विजय चौगुले विरुद्ध भाजपाच्या मंदा म्हात्रे तसेच गडचिरोलीमध्ये भाजपाचे अमरीश आत्राम उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी करत आहे. काँग्रेसवर कुरघोडी करत ठाकरे गटाने उमेदवारी आधीच दाखल केले आहेत. काँग्रेस पक्षाकडून उबाठा गटाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली असून काँग्रेस पक्षानेदेखील या ठिकाणी आपला उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवार माघार न घेतल्यास काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार गटात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील तिकीट उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार गटाला दिल्याने काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांनीही बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे, सत्तांतरात साथ देणाऱ्या आमदाराला तिकीट नाकारल्याने बंडखोरीचे सावट शिवसेनेवर दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.