-
वंदना बर्वे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना भाजपा (BJP) हायकमांडला तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच कारणामुळे निकालाला तीन दिवस लोटल्यानंतरही महायुतीकडून सरकार स्थापन करण्याचा दावा केला नाही. तसेच येत्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचे नाव भाजपा (BJP) जाहीर करणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजतंय.
मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना भाजपा (BJP) हायकमांडला विविध दृष्टिकोनातून विचार करावा लागणार आहे. भाजपाच्या 132 जागा निवडून आल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्री पद भाजपाला (BJP) मिळायला पाहिजे, एवढाच विचार करून चालणार नाही याची जाणीव गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना आहे. भाजपाला (BJP) सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाराज होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. ते आणि त्यांची शिवसेना नाराज झाली तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे हे हायकमांडला माहित आहे.
(हेही वाचा – crystal point mall मध्ये तुम्ही काय काय खरेदी करु शकता? वाचा परिपूर्ण शॉपिंग गाइड!)
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणे आहे. भाजपासाठी महानगरपालिका महाराष्ट्र राज्याच्या सत्तेएवढीच महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे नाराज झाले तर या निवडणुकीत हाती येणारी महानगरपालिका घालवावी लागू शकते. भाजपाला ही रिस्क अजिबात घ्यायची नाही आहे.
याशिवाय शिवसेनेचे सात खासदार आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार युतीतील घटक पक्षांच्या टेकुवर टिकून आहे. शिंदे यांची नाराजी ओढवून भाजपाचा मुख्यमंत्री बनविणे धोकादायक ठरु शकते. यामुळे पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही भाजपाला (BJP) मुख्यमंत्री पदाचा निर्णय घ्यायला उशीर होत आहे.
(हेही वाचा – Mumbai Terror Attack : राज्यपालांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन)
एकीकडे शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा राजकीय पराभव करण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सक्षम आहेत, तर दुसरीकडे अडीच वर्षांच्या सुशासनाचा दावा आणि बाळासाहेबांचे खरे उत्तराधिकारी म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे आले आहेत. राज्यातील या मोठ्या विजयामागे लाडकी बहीण योजनेचा हात असल्याचा सर्वांचाच विचार असून राज्यात याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जात आहे. शिंदे यांचाही वैयक्तिक प्रभाव होता, असे मानणारे भाजपामध्येच काही नेते आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री चेहरा ठरवण्याबरोबरच आवर्तनावरही चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे.
अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे योग्य उमेदवार होते आणि भाजपाने तसे जाहीरही केले होते. पण केंद्रीय नेतृत्वाच्या रणनीतीनुसार फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले. यामागे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना समर्थक एकत्र येतील ही रणनीती यशस्वी ठरली आणि उद्धव ठाकरे गटाला डावलले गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community