मुख्यमंत्रीपद भाजपाकडे ?; अमित शाह काढणार Eknath Shinde यांची समजूत

81
मुख्यमंत्रीपद भाजपाकडे ?; अमित शाह काढणार Eknath Shinde यांची समजूत
मुख्यमंत्रीपद भाजपाकडे ?; अमित शाह काढणार Eknath Shinde यांची समजूत

विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आहे. परंतु, राज्यात मिळालेले यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे असल्याचे सांगत शिवसेनेने भाजपावर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. मात्र, भाजपा मुख्यमंत्री पदाबाबत आग्रही असल्याने शिंदे नाराज झाले असून सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी सर्व गाठीभेटी रद्द केल्या. तसेच विधानसभेचा कालावधी आज विसर्जित होणार असल्याने ते राजीनामा देऊन वेगळी भूमिका घेणार असल्याचे समजते.

(हेही वाचा – Mumbai Terrorist Attack : २६/११ हल्ल्याला उलटली १६ वर्षे; मुंबईच्या किनारपट्टीवर सुरक्षेची मोठी आव्हाने)

महायुतीत भाजपाला १३३, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपा (BJP) बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्याने संख्याबळाच्या खेळीत मित्रपक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे. दुसरीकडे महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात नेत्रदीपक यश मिळाल्याने मुख्यमंत्री पद शिंदे त्यांच्या कडे ठेवावे, अशी आग्रही भुमिका सेना आमदारांनी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी शिंदे भाजपासोबत वाटाघाटी करत होते. भाजपा (BJP) देखील मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी तयार नसल्याने शिंदे नाराज झाले आहेत. सोमवारी संध्याकाळ नंतरच्या त्यांच्या सगळ्या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या. वर्षावर पोहोचलेल्या स्वपक्षीय आमदारांनादेखील ते भेटलेले नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी देखील एक्स या ट्विटर हँडलवरून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, काहीच वेळात हे ट्विट डिलीट मारले. त्यामुळे सेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. अशात २६ नोव्हेंबरला चौदाव्या विधिमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. या काळात मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा जाहीर न झाल्यास तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपाला (BJP) मागील ५ वर्षे सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही मुख्यमंत्री मिळाले नव्हते. त्यामुळे आता ही संधी सोडू नये, अशी भाजपामधील नेत्यांची भूमिका आहे. शिंदे मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नसल्याने दिल्ली स्तरावरून सूत्रे हलवण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत येणार असून मुख्यमंत्री पदा बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे मुख्यमंत्री पदाबाबत आग्रही राहिल्यास पुन्हा सत्ता संघर्षाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.