विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभुमीवर जाहीरनामे प्रसिध्द करण्यात येत आहेत. अशातच, उबाठा गटाने आपला वचननामा प्रकाशित केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा मातोश्रीतून प्रकाशित केला. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.
अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 7, 2024
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.”
(हेही वाचा-शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी)
“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे.” असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community