‘कॉमन मॅन’ असलेला सीएम जनतेला ‘सुपर मॅन’ बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: CM Eknath Shinde

119
'कॉमन मॅन' असलेला सीएम जनतेला 'सुपर मॅन' बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: CM Eknath Shinde
'कॉमन मॅन' असलेला सीएम जनतेला 'सुपर मॅन' बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: CM Eknath Shinde

आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या योजना कधीही कुणी सुरू केल्या आणि राबवल्या नाहीत तेवढ्या गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने यशस्वीपणे राबवल्या असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. आपण मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’ आहे, मात्र मला जनतेला ‘सुपर मॅन’ करायचे असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुक्ताईनगर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यानी आपले हे मत व्यक्त करत महायुतीचे प्रमुख म्हणून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांचे जिथे नुकसान झाले आहे. अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा-Abhijit Katke: डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड!)

यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना दीड हजारांची किंमत कळणार नाही मात्र या एकनाथ शिंदेला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस मात्र आणायचे आहेत असे सांगितले. राज्यातील लाडक्या बहिणीच लाडक्या भावाना येत्या 20 नोव्हेंबरला नक्की काय करायचे ते सांगतील असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. दिवाळी जवळ आलेली आहे, आणि आताच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटू लागले आहेत. 23 तारखेला महायुतीच्या विजयाचा जो धमाका होईल तो आयटम बॉम्ब असेल, याच दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके या मुक्ताईनगर मध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत, असेही शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा-Bomb Threat : सरकार आता विमानांना बॉम्बची धमकी देणाऱ्यांवर करणार कायदेशीर कारवाई; दोषींसाठी उचललं मोठं पाऊल!)

चंद्रकांत पाटील हा बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक आहे. एक कडवट शिवसैनिक आहे. गेल्या दोन वर्षात त्यांच्या या मतदारसंघातील विविध कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे. हा देणारा मुख्यमंत्री आहे हा महायुतीच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात हा दोन्ही हातांनी देण्याचे काम करत आला असल्याचे स्पष्ट केले. मी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना ती फक्त निवडणूकीची घोषणा वाटली,चुनावी जुमला वाटली पैसे येणार नाहीत असे वाटले मात्र हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे एका महिन्याच्या आत महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली. त्यामुळे विरोधक चक्रावले, ‘बुरी नजर वाले तेरा मूह काला’ अशी त्यांची अवस्था झाली. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहितेचा अडसर येणार याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले होते असेही त्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

राज्यातील महायुती सरकार फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करून थांबले नाही तर लेक लाडकी लखपती योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सवलत दिली. त्यामुळे तोट्यात चालणारी एसटी आज फायद्यात आली हे या सरकारने केलेले काम आहे. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी अनेक लोकोपयोगी कामे केली असून आम्ही केलेल्या कामाची पोचपावती जनता नक्की दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. (CM Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.