विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात उबाठा गटाने दंड थोपटल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना हायकमांडकडून जागावाटपाच्या चर्चेत पुढाकार घेण्यास सांगण्यात आले. मात्र या सगळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याची माहिती एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ‘हिंदूस्थान पोस्ट’ला नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. (Congress)
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवार दिल्यानंतर त्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या वर्षा गायकवाड यांनी पटोलेंविरोधात हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली होती. आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर राज्यातील काँग्रेसी वरिष्ठांनी हे प्रवक्ते आणि नेते राज्यात अॅक्टिव्ह नाहीत, असा रिपोर्ट तयार करून हायकमांडला पाठवला असल्याचे समजते. (Congress)
चक्क माजी मुख्यमंत्र्यांनाच लावले ‘इच्छुकां’च्या मुलाखती घेण्याच्या कामाला
यामध्ये मुख्यमंत्री पदी राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला पुण्यात आणि औरंगाबादमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास राज्यातील काँग्रेस प्रमुखांनी पाठवले. मात्र यामागे हायकंमाडच्या बैठकीत येऊ न देणे, हे राज्यातील काँग्रेस प्रमुखांचा डाव असल्याचे काँग्रेसी नेत्यांने सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनाच आता राज्यातील काँग्रेस हायकमांडकडून डावलले जात असल्याचे दिसते आहे. (Congress)
काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर
आतापर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचे (Congress) ९ प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, परंतु वरिष्ठांना डावलण्याची अशी कार्यपद्धती याआधी पाहायला मिळाली नव्हती. म्हणूनच पक्षातंर्गत नाराजी वाढली असल्याचे सांगितले जाते. गेल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना साधा एक फोनही केलेला नाही, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ नेतेच खासगीत देत आहेत. यातूनच पक्षातंर्गत संघटनेत किती नाराजी आहे, याची कल्पना येऊ शकते.(Congress)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community