मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज मिळाला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नावाचा उल्लेख आहे. या मेसेजद्वारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat) देण्यात आली आहे. मेसेज मिळाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस सक्रिय झाले असून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी नंबरवरून संदेश आला आहे की, ‘ योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी १० दिवसांत राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना बाबा सिद्धीकीसारखे मारू.’ (Baba Siddiqui) शनिवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी हा संदेश मिळाला, त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
(हेही वाचा-छत्तीसगडमध्ये वाहनांवर भगवे झेंडे लावून Christian Missionaries यांचा धर्म प्रचार)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व रणधुमाळी सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community