EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; उबाठाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

61
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; उबाठाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; उबाठाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

उबाठाचे नाशिक मध्यमधील उमेदवार आणि माजी आमदार वसंत गीते यांना ईव्हीएमद्वारे जिंकवण्याची आणि खंडणी दिली नाही, तर हारवण्याची धमकी दिली आहे. ईव्हीएम (EVM) मशीन हॅक करीत तुम्हाला विजयी करून देतो. (Maharashtra Assembly Election 2024) त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा निश्चित पराभव करीन, असे सांगून एका भामट्याने ५ लाख रुपयांची खंडणी तात्काळ मागितली. कार्यालयातील कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या भामट्याला ताब्यात घेतले आहे. निवडणुकांमध्ये पैसे कमविण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले आहे.

(हेही वाचा – Rajasthan : वर्षभरात रणथंबोरमधील 25 वाघ बेपत्ता)

काय आहे प्रकरण ?

मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबई नाका येथील उमेदवाराच्या कार्यालयात भगवानसिंग चव्हाण (३४, रा. गोगरा अजमेर, राज्य राजस्थान, सध्या रा. विठूमाऊली कॉलनी, म्हसरूळ लिंक रोड) हा परप्रांतीय युवक आला. कार्यालयातील आनंद शिरसाठ यांना ‘मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून १० मतदानापैकी ३ ते ४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीमध्ये जिंकून देतो. बदल्यात ४२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यापैकी ५ लाख आता द्यावे, अशी मागणी केली.

पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तो पत्ता सांगून निघून गेला. शिरसाठ यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भगवानसिंगला उचलले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.