Haroon Khan : उबाठाच्या मशालीचा प्रचार आता उर्दूमध्ये

165
Haroon Khan : उबाठाच्या मशालीचा प्रचार आता उर्दूमध्ये
Haroon Khan : उबाठाच्या मशालीचा प्रचार आता उर्दूमध्ये

एकेकाळी प्रखर हिंदुत्वासाठी आग्रही असलेल्या उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आता उर्दूत प्रचार करण्याची वेळ आली आहे. मतांच्या राजकारणाचा मेळ साधण्यासाठी उबाठाने मुंबईतील वर्सोवा (Versova) येथे हारून खान (Haroon Khan) या मुसलमान नेत्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकेकाळी उर्दूला अनुदान देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्याच उमेदवाराचा प्रचार आता ऊर्दूमध्ये होत असल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार)

यापूर्वी मालेगाव येथील सभेचा प्रचार करण्यासाठी उबाठाने उर्दूत पोस्टर लावले होते. मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने २०२१ मध्ये उर्दू भाषेत दिनदर्शिकाही प्रसिद्ध केली होती. बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट या शब्दाच्या ऐवजी जनाब लिहिण्यात आले होते.  उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी दिलेल्या अल्ला हू अकबरच्या घोषणाही अजून ताज्या आहेत. अशातच हे उर्दू पोस्टर समोर आल्याने उबाठाचे खरे रूप उघड झाले, अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीतही उबाठाचे उमेदवार निवडून येण्यात मुसलमान मतांचा टक्का निर्णायक होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.