महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minster) शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला. ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत भाजपाचे जवळपास १२-१३ आमदार तसेच शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षाचे ६-७ आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ५-६ आमदार मंत्रीपदाची शपथ ग्रहण करतील, अशी शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
विरोधकांना चिंता
विधानसभा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही, याची चिंता सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना अधिक आहे, असे दिसते. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत रोज सकाळी अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नसल्याबद्दल चिंता व्यक्त करतात.
(हेही वाचा – Tanaji Sawant यांचे मंत्रिपद धोक्यात?)
शिंदे-पवार उपमुख्यमंत्री
अखेर शनिवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे शपथविधी होईल, अशी घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री (Chief Minster) आणि दोन उपमुख्यमंत्री इतकेच शपथ घेणार की आणखी काही मंत्री शपथ घेणार याबाबत संभ्रम होता. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री (Chief Minster) पदाची शपथ घेतील तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार हे (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपाचे सर्वाधिक १३२ आमदार निवडून आल्यामुळे २२-२४ मंत्रीपदे भाजपाच्या वाट्याला जातील. त्यापैकी १२-१३ आमदार मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतील.
शिंदे पवारांचे मंत्रीही शपथ घेणार
तर भाजपा खालोखाल शिवसेनेची आमदार संख्या ५७ असल्याने त्यांना १०-१२ मंत्रीपदे दिली जातील आणि त्यातील ६-७ आमदार ५ डिसेंबरला शपथ ग्रहण करतील. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार संख्या तिसऱ्या क्रमांकाची असल्याने त्यांना ८-१० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून त्यातील त्यातील ५-६ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगितले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community