Maharashtra Assembly Election 2024 : आचारसंहिता भंगाच्या १६४६ तक्रारी निकाली

33
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात सर्वात जास्त ५१५ इच्छुकांचे ६६७ अर्ज दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा- Diwali 2024 : नवी मुंबईतील मोगलाई; दिवाळीनिमित्त रोषणाई केल्याने धर्मांधांची हिंदू महिलांना अश्लील शिवगाळ आणि दमदाटी)

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.