Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत ४ दिवस ड्राय डे; अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क व पोलिसांची नजर

43
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत ४ दिवस ड्राय डे; अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क व पोलिसांची नजर
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत ४ दिवस ड्राय डे; अवैध मद्यविक्रीवर उत्पादन शुल्क व पोलिसांची नजर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पाश्वभूमीवर मुंबईत १८ नोव्हेंबर पासुन पुढील चार दिवस ड्राय डे (Mumbai Dry Days) असेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) आदेशानुसार, राज्यातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा चार दिवसांचा ड्राय डे पूर्ण दिवसभरासाठी नसून मद्यविक्रेत्यांना ठराविक वेळेत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

ड्राय डे कधी असणार?
18 तारखेला प्रचार संपल्या संपल्या सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी असेल. 19 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 तारखेलाही राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 18, 19, 20 आणि 23 असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी सार्वजनिक जाहीर करण्यात आली. क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.