विधानसभा निवडणुकींच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभुमीवर राज्यात जागावाटपावर नेत्यांच्या चर्चा बैठका सुरु आहेत. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात रस्सीखेच सुरु आहेत. यावरुन संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्यातच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 12.30 वाजता बैठक पार पडणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election: आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या, ‘काय करावे आणि काय करू नये?’)
उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता ठाकरेंनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय काँग्रेससोबत जागावाटपावरुन जो वाद सुरु आहे त्याबाबत ठोस निर्णय घ्यावा का, याबाबत देखील चर्चा करण्यात येईल, अशी माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
मविआच्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट 12 जागांसाठी आग्रही आहे. विदर्भातल्या जागांवरुनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत म्हणाले, “माझी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. त्यानंतर मातोश्रीवर साडे बारा वाजता शिवसेनेच्या सर्व नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. नेत्यांशी चर्चा करावी लागेल. त्यासंबंधी ही तातडीची बैठक आहे. मातोश्रीवर जाऊन चर्चा करु आणि पुढच्या वाटचालीबाबत निर्णय घेऊ.” असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community