Maharashtra Assembly Election 2024: अखेर गोपाळ शेट्टींचं बंड शमले; काय आहे कारण?

129
Maharashtra Assembly Election 2024: अखेर गोपाळ शेट्टींचं बंड शमले; काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024: अखेर गोपाळ शेट्टींचं बंड शमले; काय आहे कारण?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जवळ येत असताना सर्वच पक्ष प्रचारासाठी तयारीला लागले आहेत. आज (४ नोव्हें.) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न पक्षाकडुन केले जात आहेत. यात बोरिवली विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Assembly Election 2024) मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे माजी खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) हे नाराज होते.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस; अनेक मतदारसंघातील लढत होणार निश्चित)

माजी खासदार गोपाळ शेट्टी हे २००४ आणि २००९ या कालावधीत बोरिवली मतदारसंघात (Borivali Constituency) आमदार होते. पण २०१४ मध्ये पक्षाने त्यांना बाजूला करत विनोद तावडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) यांना बाजूला करत सुनील राणे (Sunil Rane) यांना उमेदवारी देण्यात आली. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाने राणेंनाही कायम न ठेवता संजय उपाध्याय यांना उमेदवारी देऊ केली. ज्यामुळे भाजपाने बोरिवली विधानसभेसाठी बाहेरुन उमेदवार आणले, असे गोपाळ शेट्टी यांचे म्हणणे होते. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, Chhagan Bhujbal काय म्हणाले ?)

तर लोकसभेतही भाजपाने गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत त्याजागी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली. पीयूष गोयल हे सुद्धा पक्षाने बाहेरून आणलेले उमेदवार आहेत. त्यामुळे आता बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही, असे म्हणत माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली होती. (Maharashtra Assembly Election 2024)

या नाराजीनाट्यानंतर आशिष शेलार, पियुष गोयल, विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली होती. तर काल रात्री (३ नोव्हें.) ३ तास झालेल्या चर्चेनंतर गोपाळ शेट्टी यांनी अखेर आपला निर्णय बदलला आहे. गोपाळ शेट्टींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.