Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस; अनेक मतदारसंघातील लढत होणार निश्चित

83
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस; अनेक मतदारसंघातील लढत होणार निश्चित
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस; अनेक मतदारसंघातील लढत होणार निश्चित

विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांत पात्र उमेदवारांची संख्या ७०६६ इतकी आहे. यातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात, हे आज स्पष्ट होईल.

मुंबईतील माहिम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उबाठा गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुती प्रयत्नशील असताना त्यांनी त्यास साफ नकार देत लढण्याचे ठरवले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्याही जास्त होती. पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांत इच्छुकांनी बंड केले, तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले. अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्याने हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे.

गोपाळ शेट्टी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार
दुसरीकडे बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी भाजपची डोकेदुखी वाढविली होती. शेट्टी यांनी शनिवारी फडणवीस यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. ‘भाजप कधीच सोडणार नाही आणि पक्षाचे नुकसान होईल, असे काही करणार नाही,’ अशी ग्वाही शेट्टी यांनी दिल्याची माहिती तावडे यांनी ‘एक्स’ समाज माध्यमातून दिली. या संदर्भात शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाईल, असे स्पष्ट केले. फडणवीस, तावडे आणि शेलार यांची भेट घेतल्याने शेट्टी माघार घेतील, असे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते. आता गोपाळ शेट्टी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.