Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? अमित शाह म्हणाले…

126
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? अमित शाह म्हणाले...
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? अमित शाह म्हणाले...

१० नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संकल्पपत्र प्रसिद्ध करण्यात आले. या वेळी अमित शाह यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, हेही स्पष्ट केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : राममंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास ३ महिने उशीर; काय आहे कारण ?)

महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर सरकार कुणाचं येणार, याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. महायुतीने पुन्हा आम्हीच येऊ, असे म्हटलं आहे, तर महाविकास आघाडीने आमच्या १८० हून जास्त जागा येतील, असा दावा केला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात भाजपाने जाहीरनामा जाहीर केला आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती कुणीही मुख्यमंत्री जाहीर केलेला नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवू, असे म्हटले आहे. अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री कोण होईल, या प्रश्नावर उत्तर दिले.

सध्या महायुतीचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार?, हे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. महायुतीची सत्ता आल्यावर तीन पक्षांची कमिटी तयार होणार आहे. ती कमिटी तिन्ही पक्षाचा संकल्पपत्राचा अभ्यास करुन ती लागू करण्याबाबत निर्णय घेणार आहे, असे अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.