Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!

80
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!

मुंबईच्या भुलेश्वरमधून (Bhuleshwar) १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (Mumbai Crime) या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा-Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!)

यापूर्वी पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात येत होता. आता मात्र पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लोक कुठे जात होते. ही रक्कम कोणाची आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात आहे. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर सातत्याने अशी रोकड सापडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा-Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस केवळ आमचे राजकीय शत्रू ; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण)

निवडणूक आयोगाने (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आणि आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात दोन ठिकाणी मोठं घबाड सापडलं होतं. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरिल खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. त्यानंतर हडपसरमध्येही पोलिसांनी नाकाबंदीच्या वेळेस (२२ ऑक्टोबर) संध्याकाळी एका गाडीतून तब्बल २२ लाख ९० हजार रुपये रोकड जप्त केली होती. आता मुंबईतील भुलेश्वरमध्येही असचं मोठं घबाड सापडलं आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.