Mahim Assembly : अमित ठाकरेंविरोधात लढण्यावर सरवणकर आणि सावंत ठाम, मंडळांच्या भेटीगाठीवर भर

174
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
Sada Sarvankar यांनी निवडणूक लढवणे मनसेच्या पथ्यावर
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

माहीम विधानसभा (Mahim Assembly) मतदार संघातून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उबाठा शिवसेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे तर्क वितर्क लढवले जात असले तरी प्रत्यक्षात हे दोन्ही उमेदवारी अज मागे घेण्याच्या मानसिकतेत नाही. कोणत्याही परिस्थिती अर्ज मागे घेतले जाणार नाहीत असे दोन्ही उमेदवार सांगत असून या दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून मतदार संघातून आपल्याबाबतेच वातावरण जाणूस घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक मंडळांना महेश सावंत आणि सदा सरवणकर (Sada Saravankar) हे भेटी देत मतदारांचा कौल समजून घेताना दिसत आहेत.

माहीम विधानसभा (Mahim Assembly) मतदार संघातून शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेच्यावतीने अमित राज ठाकरे आणि उबाठा शिवसेनेच्यावतीने विभागप्रमुख महेश सावंत यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर असल्याने या तारखेपर्यंत काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण ?)

मात्र, सन २०१४पासून सलग दोन वेळा आमदार आणि यापूर्वी दादर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या सदा सरवणकर हे आता सन २० २४मध्ये माहीम दादर विधानसभेतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरत विजयाची हॅट्रीक मारण्यास सज्ज झाले आहे. मात्र, या मतदार संघातून मनसेच्यावतीने अमित राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा विजय सुकर व्हावा याकरता सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास स्वत:च्या पक्षातील नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांचाही दबाव वाढत आहे. मात्र, माहीम दादरमधील जनता तथा मतदारांचा विश्वास आपल्यावर असल्याने आपण माघार घेणार नाही असा पावित्रा सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांनीही उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा पावित्रा घेतला आहे. उलट दिवसा आणि रात्र विभागातील सर्व मंडळांना भेटी देत महेश सावंत हे जनतेचा तथा मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक मतदार तसेच जनतेकडून त्यांना कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेतला जावू नये असे सांगितले जात आहे. त्यामुळे महेश सावंत यांचा आत्मविश्वास अधिक वाढला गेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती अर्ज मागे घेतला जाणार नाही यावर ठाम आहेत. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता आता निवडणूक लढवणारच असाही निर्धार सरवणकर यांच्याप्रमाणेच महेश सावंत यांनी केल्याने अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना या दोघांना टक्कर देण्याची वेळ येईल असे बोलले जात आहे. त्यामुळे माहीमकर हे कोणाला विधानसभेत पाठवतात आणि घरी बसवतात हे ठरण्या आधी कोण माघार घेतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.