मनसे अध्यक्ष राज ठाकरे दि. २१ ऑक्टोबर डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेची पहिली यादी जाहिर केली. त्यात कल्याण विधानसभा मतदारसंघातून राजू पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. तर अविनाश जाधव यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. (MNS)
(हेही वाचा : Language : देशातील ११७ भाषा नामशेष होण्याच्या वाटेवर)
दरम्यान राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारीचे फॉर्म भरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज ठाकरेंनी दि. २२ ऑक्टोबर रोजी मनसेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहिर होणार असल्याचे सांगितले. त्यात अमित ठाकरे यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महिमा विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर उबाठा गटानेही अमित ठाकरे महिममधून उभे राहणार असल्यास तिथे उमेदवार न देण्याची घोषणा केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community