Mumbai University च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; ‘हे’ आहे कारण

117
Mumbai University च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; 'हे' आहे कारण
Mumbai University च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; 'हे' आहे कारण

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे (Maharashtra Assembly Election 2024) मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापिठाने मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे, यासाठी मुंबई विद्यापिठाने (Mumbai University) नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा ३० नोव्हेंबरला घेण्यात येईल. २० नोव्हेंबरच्या परीक्षा ७ डिसेंबरला घेतल्या जातील.

(हेही वाचा – Classical Language : अभिजात मराठी भाषा आणि राजकीय भाषा!)

२० नोव्हेंबर या दिवशी परीक्षा असल्याने मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे मतदान गावी असल्याने त्यांना या कालावधीत प्रवास करून गावी जाणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्याबाबतचे पत्र युवा सेनेने विद्यापिठाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा रौंदळे यांना दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापिठाने (Mumbai University) घेतला आहे.

१९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, विद्यापीठाने केवळ १९ आणि २० नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलली आहे. परंतु, मुंबईपासून गाव दूर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २० तारखेला मतदान करून २१ तारखेला परीक्षेसाठी पोहोचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने २१ नोव्हेंबरची परीक्षाही पुढे ढकलावी, अशी मागणी युवा सेनेचे उपसचिव सचिन पवार यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.