महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात (MVA Seat Sharing) सामना वृत्तपत्रातून नवा फॉर्म्युला सांगितला आहे. आता मविआचा फॉर्म्युला 85-85-85 वरुन 90-90-90 वर पोहोचला आहे. तर, मित्रपक्षांना 18 जागा दिलेल्या आहेत. काँग्रेसचे नेते दिल्लीला गेल्यानंतर या फॉर्म्युलामध्ये बदल झाला असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माहिती दिली असून नव्या फॉर्म्युलानुसार तिन्ही पक्षाच्या जागांमध्ये वाढ झाली असून उर्वरित जागा या मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.(MVA Seat Sharing)
काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?
काँग्रेस (Congress), ठाकरे गट (Thackeray group) आणि शरद पवार गट राष्ट्रवादी (Sharad Pawar Group NCP) या तीन पक्षांच्या जागा (MVA Seat Sharing) वाढून त्या 90-90-90 झाल्या आहेत. त्यामुळे ज्या 18 जागा उरणार आहेत, त्या मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती थोरात यांच्याकडून देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडी कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही. आमचे सक्षम असलेले उमेदवार आम्ही देणार आहोत. राज्याची निवडणूक आहे, काही अडचणी आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही थोरातांकडून सांगण्यात आले. (MVA Seat Sharing)
काँग्रेस 100 च्या पुढे जाऊ शकते का ?
तसेच, मित्रपक्षांसाठी 18 जागा (MVA Seat Sharing) बाजुला ठेवलेल्या आहेत. त्यातूनही किती सुटतात ते पाहत आहोत. आमचा 85-85-85 चा फॉर्म्युला वाढून आता 90 वर गेला आहे. काँग्रेस 100 च्या पुढे जाऊ शकते का याची बेरीज अद्याप केलेली नाही अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ज्यामुळे आता महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तिन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. (MVA Seat Sharing)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community