Nana Patole यांनी तिकिटे विकली; काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांचा आरोप

59
Nana Patole यांनी तिकिटे विकली; काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांचा आरोप
Nana Patole यांनी तिकिटे विकली; काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांचा आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाच्या तिकीट विकल्या, असा गंभीर आरोप उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे (Vijay Khadse) यांनी केला आहे. खडसे यांनी काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी न मिळाल्याने मंगळवारी अपक्ष अर्ज दाखल केला. यासंदर्भात पटोले यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : २८८ जागांसाठी १०९०५ अर्ज; ७९९५ उमेदवार रिंगणात)

उमरखेड विधानसभा मतदारसंघातून २००९च्या निवडणुकीत खडसे हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यांनी उमरखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाकडे अर्ज केला होता. सर्वेक्षणात आपण अव्वल स्थानी होतो. असे असूनही त्यांनी विदर्भातील आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या मोपलवारच्या माणसाला उमेदवारी दिली, असा दावाही खडसे यांनी केला आहे.

संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशभरात काँग्रेसचे वातावरण तयार केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी निवड समितीला काही निकष पाळण्याचे निर्देश दिले होते. भ्रष्टाचारी आणि पक्षाबाहेरील व्यक्तींना उमेदवारी न देण्याचे बजावले होते. पटोले यांनी हे सर्व निकष गुंडाळून तिकिटे विकली, असा आरोपही खडसे यांनी केला आहे. (Nana Patole)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.