Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार

72
Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार
Ncp Sharad Pawar गटाची पहिली यादी जाहीर, बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई होणार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दि. २४ ऑक्टोबर रोजी पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत घेत शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कर्जत- जामखेड मतदारसंघातून रोहित पवार, मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड, इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील, बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांना तर विक्रमगड मतदारसंघातून सुनील भुसारा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर युगेंद्र पवार यांना बारामती मतदारसंघातून काका अजित पवार यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. (Ncp Sharad Pawar)

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटलांनी ही यादी जाहीर केली. त्यावेळी सुरुवातीला एकूण ४४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्यामध्ये पुण्यातील उमेदवारांची नावे नव्हती. त्यामुळे पत्रकार आणि कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे ४५ वे नाव हडपसर विधानसभेसाठी प्रशांत जगताप यांच्या नावाची घोषणा केली. (Ncp Sharad Pawar) तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांची नावे मुंबईत जाऊन घोषित करणार असल्याचे ही पाटलांनी सांगितले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

इस्लामपूर- जयंत पाटील
काटोल- अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंबा कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहूरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर- अशोक पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत-जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भांबळे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी -बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलिप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे
नागपूर पुर्व – दिनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत बोपचे
अहेरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – रुपकुमार चव्हाण
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर (पुर्व) – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वर्पे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी- मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
चिपळून- प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.