राज्यात विधानसभा निवडणूकीचे (Vidhan Sabha election 2024) बिगुल वाजले असून, निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी महाराष्ट्र राज्यातील मतदान एकाच टप्प्यात होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या उमेदरांची यादी जाहीर होण्या अगोदरच प्रचारसभांचा जोर वाढला आहे. अशातच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी स्टार प्रचारकांची यादी (NCP Star Campaigner) जाहीर केली आहे. (NCP Star Campaigner)
अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे नाव या यादीत नाही. नवाब मलिक यांच्यावर ईडीचा खटला सुरू आहे. त्यांच्या नावावर भाजपाचा देखील आक्षेप आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी टोला देखील मारला आहे.
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार,
राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..!विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत… pic.twitter.com/0ph5JqMhDG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 21, 2024
‘एक्स’वर स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना अजित पवार यांनी लिहिले की, “महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ वाहणार, राष्ट्रवादीचे घड्याळ जोमाने फिरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Star Campaigner) पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Abhijit Katke: डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड!)
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये या नेत्यांचा समावेश
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, नितीन पाटील, सयाजीराव शिंदे, अमोल मिटकरी, जल्लाउद्दीन सय्यद, धीरज शर्मा, रुपाली इंद्रिया, सुप्रसिद्ध नाईक, सुप्रसिद्ध पाटील, कृष्णा चव्हाण आदी नेत्यांची यात नावे आहेत. तर कल्याण आखाडे, सुनील मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वसीम बनहान, प्रशांत कदम, संध्या सोनवणे यांच्या नावांचाही यात समावेश आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community